भारत ही एक प्रयोगशाळा आहे: बील गेट्स
या वक्तव्यानंतर बील गेट्रस यांच्यावर भारतीय नेटकऱ्यांकडून टीका
नुकत्याच रीड हॉफमन यांच्या पॉडकास्टवर मायक्रोसॉफ्ट कंपनीचे सह-संस्थापक बिल गेट्स यांनी हजेरी लावली. या पॉडकास्टमध्ये त्यांनी भारताविषयी वक्तव्य केले त्यानंतर नेटीझन्स त्यांच्यावर चांगलेच भडकले आहेत. या वक्तव्यानंतर बील गेटस् पुन्हा एकदा नव्या वादात अडकले आहेत.
पुढे ते म्हणाले, आरोग्य, पोषण, शिक्षण अशा क्षेत्रांमध्ये खूप सुधारणा झाल्या आहेत. भारतात खूप समस्या आहेत. इतक्या समस्या असूनही या देशाचा महसूल चांगला आहे. हा देश पुरेसा स्थिर आहे. येत्या २० वर्षात भारताची प्रगती बघून तुम्हा आश्यर्यचकित व्हाल. हा देश एक प्रयोगशाळा आहे. जिथे तुम्ही विविध गोष्टींवरचे प्रयोग करून बघू शकता.
त्यांच्या या वक्तव्यानंतर बील गेट्स यांच्यावर सोशल मिडीयावर टीका करण्यात येत आहे. तर बील गेट्स फाऊंडेशन तर्फे २००९ मध्ये जे लसीकरण करण्यात आले होते. त्यामुळे लसीकरण झालेल्या विद्यार्थांवर साईड ईफेक्ट झाले, यावरही पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली.
२००९ च्या लसीकरणात नेमकं काय घडलं ?
भारतात २००९ साली पाथ (प्रोग्रॅम फॉर अॅप्रोप्रिएट टेक्नॉलॉजी इन हेल्थ) आणि आयसीएमआर (इंडियन कांऊंसिल ऑफ मेडिकल रिसर्च) यांच्या संयुक्त विद्यमाने एका लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. या मोहीमेंतर्गत तेलंगणा आणि गुजरातमधील १४ हजार आदीवसी शाळेच्या विद्यार्थ्यांचे सर्वाकल कॅन्सर (cervical cancer) प्रतिबंधक लसीचे लसीकरण करण्यात आले. त्यानंतर काही महिन्यांनी अनेक विद्यार्थ्यांमध्ये या लसीकरणाचे वाईट परिणाम दिसून आले तर ७ विद्यार्थी मृत्यूमुखीही पडले. या मोहिमेवर अनेक आरोप करण्यात आले. पण फौंडेशनने या आरोपांना फेटाळून लावत. विद्यार्थ्यांचा मृत्यू ही आत्महत्या असल्याचा दावा केला होता.