For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आगामी ‘टी-20’ विश्वचषकाचा भारत प्रबळ दावेदार

06:55 AM Nov 29, 2023 IST | Tarun Bharat Portal
आगामी ‘टी 20’ विश्वचषकाचा भारत प्रबळ दावेदार
Advertisement

माजी प्रशिक्षक रवी  शास्त्री चे मत : परंतु बाद फेरीतील शेवटच्या दोन लढती जिंकणे महत्त्वाचे

Advertisement

वृत्तसंस्था/ मुंबई

भारताचा माजी मुख्य प्रशिक्षक रवी  शास्त्रीने पुढील वर्षी होणाऱ्या टी20 विश्वचषक स्पर्धेचे जेतेपद मिळविण्याच्या दृष्टीने भारताला ‘प्रबळ दावेदार’ ठरविले आहे. परंतु त्याकरिता बाद फेरीतील शेवटच्या दोन सामन्यांत विजय मिळवणे महत्त्वाचे आहे, याकडे त्याने लक्ष वेधले आहे.

Advertisement

ऑस्ट्रेलियाने अहमदाबादमध्ये झालेल्या एकतर्फी अंतिम सामन्यात भारताला हरवून एका आठवड्यापेक्षा जास्त काळ लोटला आहे. यजमान संघ 10 सामन्यांत अपराजित राहिल्यानंतर ज्या प्रकारे अंतिम फेरीत हरला तो देशातील क्रिकेट वर्तुळात अजूनही चर्चेचा विषय बनून राहिलेला आहे.

कोणतीही गोष्ट सहजासहजी मिळत नाही. अगदी महान खेळाडू सचिन तेंडुलकरलाही एक विश्वचषक जिंकण्यासाठी सहा स्पर्धा खेळाव्या लागल्या. विश्वचषक सहजासहजी जिंकता येत नाही, विश्वचषक जिंकण्यासाठी त्या महत्त्वाच्या क्षणी खूप चांगले खेळणे आवश्यक असते, असे शास्त्राrने ‘इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग’च्या एका कार्यक्रमात बोलताना सांगितले. त्याआधी जी काही कामगिरी केलेली असते ती त्यावेळी गणली जात नाही. त्या महत्त्वाच्या दिवसानुरुप उसळी घेऊन कामगिरी करायची असते, असे तो म्हणाला.

एकदा अव्वल चार संघ उपांत्य फेरीत आणि अंतिम फेरीत पोहाल्यानंतर ते दोन दिवस जर चांगली कामगिरी केलीत तर जिंकाल. नेमक्या त्या दोन दिवसांत ऑस्ट्रेलियाने मागाहून येत प्रभावी कामगिरी केली, याकडे भारताच्या या माजी कर्णधाराने लक्ष वेध्ले. त्यांनी पहिले दोन सामने गमावले, परंतु महत्त्वाच्या दोन दिवसांत त्यांनी कामगिरी करून दाखविली, असे शास्त्राrने सांगितले. पुढील वर्षी 4 जूनपासून कॅरिबियन देशांत आणि अमेरिकेत खेळल्या जाणाऱ्या टी20 विश्वचषकापूर्वी भारताला तऊण खेळाडूंचा चांगला समूह सापडला आहे, असेही मत त्याने व्यक्त केले.

भारताचा अंतिम फेरीतील पराभव जरी हृदयभंग घडविणारा असला, तरी आमचे बरेच खेळाडू त्यातून धडा घेऊन पुढे जातील. मला भारत लवकरच विश्वचषक जिंकेल असे वाटते, असे शास्त्राr म्हणाला. ते कदाचित 50 षटकांच्या सामन्यांच्या  विश्वचषकात इतक्या सहजासहजी घडणार नाही. कारण संघाची पुनर्बांधणी करावी लागेल. पण आगामी ‘टी20’ विश्वचषकात भारत खूप प्रबळ दावेदार असेल. कारण संघाचा गाभा असलेला खेळाडूंचा गट मिळालेला आहे. हे खेळाचे एक छोटे स्वरूप आहे. आपले लक्ष आता त्यावर असले पाहिजे, असे त्याने सांगितले.

विश्वचषक स्पर्धेतील सर्वात बलाढ्या संघ राहिलेल्या भारताला अंतिम फेरीत अपेक्षित कामगिरी करता आली नाही हे आठवून अजूनही दुखते, ही बाब शास्त्राrने कबूल केली. भारताच्या त्या मोहिमेची आठवण करून देताना शास्त्राr म्हणाला की, ती मोहीम विलक्षण होती. प्रामाणिकपणे सांगायचे तर, आम्ही विश्वचषक जिंकू शकलो नाही ही बाब अजूनही सतावते. कारण आम्ही सर्वांत मजबूत संघ होतो. 24 बळी घेणाऱ्या मोहम्मद शमीच्या नेतृत्वाखालील भारतीय गोलंदाजांनी एकजुटीने प्रभावी कामगिरी केल्याने भारताला ’सर्वोत्तम संधी’ मिळाल्याचे मत शास्त्राrने व्यक्त केले. स्पर्धेच्या मधल्या टप्प्यापर्यंत गोलंदाजी विभागाने ज्या प्रकारे उसळी घेतली त्यावरून भारताला एक उत्तम संधी आहे असे सर्वांना वाटले, अशी पुस्ती त्याने जोडली.

Advertisement
Tags :

.