भारत-आयर्लंड महिलांची पहिली वनडे आज
07:00 AM Jan 10, 2025 IST
|
Tarun Bharat Portal
वनडे मालिकेत दोन अर्धशतकांसह 148 तर टी-20 मध्ये सलग तीन अर्धशतके ठोकत 193 धावा फटकावल्या होत्या. खास बाब म्हणजे तिने दोन्ही मालिकांत मिळून सलग पाच अर्धशतके नोंदवण्याचा पराक्रम केला. फक्त शेवटच्या वनडेत तिला अर्धशतकी मजल मारता आली नव्हती. नियमित कर्णधार हरमनप्रीत कौरला या मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली असल्याने स्मृती मानधना नेतृत्व करणार आहे. आधीच्या मालिकेतील फॉर्म राखण्यावर तिचे लक्ष केद्रित झालेले असेल. हरमनप्रीत व रेणुका ठाकुर संघात नसल्याने फलंदाजीची भिस्त इतरांवर राहणार आहे. हरलीन देओल, प्रतीका रावल, जेमिमा रॉड्रिग्स यांच्यावर मुख्य जबाबदारी राहील. मागील वनडे मालिकेत हरलीन देओलने सर्वाधिक 160 धावा जमविल्या होत्या 115 धावांच्या शतकी खेळीचाही समावेश आहे. प्रतीका रावल व जेमिमा यांनीही उपयुक्त योगदान देत अनुक्रमे 134 व 112 धावा जमविल्या होत्या. दोघींनी वनडेत एकेक अर्धशतके नोंदवली. गोलंदाजीच्या विभागात विंडीजविरुद्धच्या वनडे मालिकेत सर्वाधिक दहा बळी रेणुका ठाकुरने मिळविले होते, तिची उणीव जाणवणार असली तरी तितास साधू व सायमा ठाकुर या नवोदितांना तिच्या गैरहजेरीत आपली क्षमता दाखवून द्यावी लागेल. 20 वर्षीय साधूने वनडेत 3 व टी-20 मध्ये 13 बळी मिळविले असून अलीकडे तिने देशी व आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वेगवान व स्विंग गोलंदाजीने प्रभावीत केले असल्याने तिच्याकडून लवकर ब्रेकथ्रू मिळवून देण्याची अपेक्षा केली जात आहे. 28 वर्षीय सायमा ठाकुरने आतापर्यंतच्या 8 वनडेत सात बळी मिळविले असून हा फॉर्म कायम राखण्यास तीही उत्सुक असेल. ऑफस्पिनर व उपकर्णधार दीप्ती शर्मा हिची कामगिरी भारतासाठी महत्त्वाची ठरणार असून विंडीजविरुद्धच्या तिसऱ्या वनडेत तिने कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी नोंदवताना 31 धावांत 6 बळी टिपले. प्रिया मिश्रा व तनुजा कंवर यांच्याकडून तिला चांगली साथ मिळण्याची अपेक्षा आहे. या मालिकेसाठी संघात स्थान मिळालेल्या अष्टपैलू राघवी बिस्त व सायली सातघरे यांच्यावरही खास लक्ष असेल. बिस्तकडे जलद धावा काढण्याची क्षमता असून ती भरवशाची क्षेत्ररक्षकही आहे. विंडीजविरुद्धच्या टी-20 मालिकेत तिला आंतरराष्ट्रीय पदार्पणाची संधी मिळाल्यानंतर येथे मिळालेल्या संधीचा ती पुरेपूर लाभ ठरविण्याचा प्रयत्न करेल. गॅबी लेविस ही आयर्लंड महिला संघाची कर्णधार असून अष्टपैलू ओर्ला प्रेन्डरगास्टकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी आहे. आत्मविश्वास दुणावलेल्या भारतीय संघाच्या कठीण आव्हानाला त्यांना सामोरे जावे लागणार आहे. आतापर्यंत दोन संघांत 12 वनडे सामने झाले असून आयर्लंडने भारतावर आजवर एकही विजय मिळविलेला नाही. 2023 मध्ये झालेल्या महिलांच्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये या दोन संघांत शेवटची गाठ पडली होती आणि भारताने तो सामना 5 धावांनी जिंकला होता. विजयी मानसिकतेनेच आपला संघ या सामन्यात उतरणार असल्याचे कर्णधार गॅबी म्हणाली. ‘भारतीय संघाविरुद्ध आम्ही प्रथमच खेळत असून त्याआधी आम्ही चांगली तयारी केली आहे. भारतीय संघात काही उत्कृष्ट खेळाडू असून त्यांचे आव्हान पेलण्यास आम्ही सज्ज आहोत,’ असे ती म्हणाली.
Advertisement
विंडीजविरुद्धचा विजयी जोम कायम राखण्यास भारतीय संघ सज्ज, भारताविरुद्ध पहिल्या विजय मिळविण्यासाठी आयर्लंड आतुर
Advertisement
वृत्तसंस्था/राजकोट
Advertisement
विंडीज महिला संघाविरुद्ध झालेल्या मालिकेत एकतर्फी विजय मिळविल्यानंतर स्मृतीच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला संघ आता आयर्लंडविरुद्धच्या मालिकेत विजयी मालिका कायम राखण्यास सज्ज झाला आहे. शुक्रवारी या दोन संघांतील पहिला वनडे सामना येथे होत आहे. या संघांत होणारी ही पहिलीच द्विदेशीय मालिका आहे. सकाळी 11 वाजता सामन्याला सुरुवात होईल. भारतीय महिलांनी विंडीजविरुद्ध 3-0 असा एकतर्फी मालिकाविजय मिळविला. त्याआधी टी-20 मालिकेत भारताने त्यांना 2-1 अशा फरकाने हरविले होते. दोन्ही फॉरमॅटमध्ये स्मृती मानधनाने शानदार फलंदाजी केली.
Advertisement
Next Article