For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारत उपांत्यपूर्व फेरीत

06:45 AM Feb 13, 2025 IST | Tarun Bharat Portal
भारत उपांत्यपूर्व फेरीत
Advertisement

मकाववर 5-0 फरकाने मात, आज कोरियाशी लढत

Advertisement

वृत्तसंस्था/ किंगडाव, चीन

बॅडमिंटन आशिया मिश्र सांघिक चॅम्पियनशिपमध्ये भारताने विजयी सुरुवात करताना गट ड मधील लढतीत मकाववर 5-0 अशी एकतर्फी विजय मिळवित उपांत्यपूर्व फेरीतील स्थानही निश्चित केले.India in 'Badminton Asia Mixed Team Championship'

Advertisement

दुबईत झालेल्या मागील आवृत्तीत भारताने कांस्यपदक पटकावले हेते. येथील विजयाने भारताची उपांत्यपूर्व फेरी निश्चित झाली आहे. दुसरी व शेवटची गटसाखळी लढत कोरियाविरुद्ध गुरुवारी होणार आहे. मिश्र दुहेरीत सतीश कुमार करुणाकरन व आद्या वरियत या राष्ट्रीय विजेत्या जोडीने भारताला विजयी सुरुवात करून देताना चाँग लिऑग व वेंग चि एन्ग यांचा 21-10, 21-9 असा पराभव केला. पुरुष एकेरीत लक्ष्य सेनने पँग फाँग पुइ याचा 21-16, 21-12 असा पराभव करून भारताची आघाडी 2-0 अशी केली.

महिला एकेरीत मालविका बनसोडने हाओ वाइ चँनचा 21-15, 21-9 असा एकतर्फी पराभव करून भारताचा विजयही निश्चित केला. पुरुष दुहेरीत चिराग शेट्टी व एमआर अर्जुन यांनी चिन पॉग पुइ व कोक वेन व्हाँग यांच्यावर 21-15, 21-19 अशी मात करून भारताची आघाडी 4-0 अशी केली. जागतिक नवव्या मानांकित त्रीसा जॉली व गायत्री गोपीचंद यांनी महिला दुहेरीच्या सामन्यात एनजी वेंग चि व पुइ चि वा यांच्यावर 21-10, 21-5 अशी मात करून भारताचा एकतर्फी विजय साकार केला.

Advertisement
Tags :

.