कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आशिया चषक तिरंदाजीत भारत सहा प्रकारांत अंतिम फेरीत

06:03 AM Feb 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ बगदाद

Advertisement

भारतीय तिरंदाजांनी येथे सुरू असलेल्या आशिया चषक पहिल्या टप्प्यातील तिरंदाजी स्पर्धेची अंतिम फेरी गाठत किमान सहा रौप्यपदके निश्चित केली आहेत. त्यात 20 महिन्यानंतर पुनरागमन करणाऱ्या माजी जागतिक अग्रमानांकित दीपिका कुमारीचाही समावेश आहे.

Advertisement

महिलांच्या रिकर्व्ह सांघिक विभागात पात्रता फेरीत दीपिकाने सिमरनजीतनंतर दुसरे स्थान मिळविले. या संघात भजन कौरचाही समावेश आहे. एलिमिनेशन राऊंडमध्ये भारतीय महिला संघाने इराक संघाचा पराभव करून अंतिम फेरी गाठली. अंतिम फेरीत भारताची लढत उझ्बेकशी होईल.

धीरज बोम्मदेवरा, प्रवीण जाधव व तरुणदीप राय या भारतीय पुरुष रिकर्व्ह संघानेही यजमान इराकचा पराभव करून अंतिम फेरी गाठली. बांगलादेशविरुद्ध त्यांची सुवर्णपदकासाठी लढत होईल. रिकर्व्ह मिश्र सांघिक विभागात भारताने सिरीया व कतार यांचा पराभव करून जेतेपदाच्या फेरीत स्थान मिळविले. जेतेपदासाठी धीरज व सिमरनजीत यांची लढत बांगलादेशविरुद्ध होईल. प्रथमेश जावकर, प्रियांश व कुशल दलाल यांनी यजमान इराकचा उपांत्य फेरीत 233-223 असा पराभव करून पुरुषांच्या कंपाऊंड सांघिक स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. इराण संघाविरुद्ध त्यांची सुवर्णपदकासाठी लढत होईल. आदिती स्वामी, प्रिया गुर्जर व परनीत कौर या तिघींनी अफगाणवर 234-210 अशी सहज मात करून महिला सांघिक कंपाऊंडमध्ये अंतिम फेरीत स्थान मिळविले. प्रथमेश जावकर व आदिती स्वामी यांनी मिश्र कंपाऊंड विभागात बांगलादेशला 157-146 असे हरवून अंतिम फेरी गाठली. इराणविरुद्ध त्यांची सुवर्णपदकाची लढत होईल.

Advertisement
Tags :
##tarunbharat
Next Article