For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आखाती देशांमधून तेल खरेदी करतोय भारत प्रति दिन 4.7 दशलक्ष बॅरलची आयात

06:25 AM Nov 28, 2023 IST | Tarun Bharat Portal
आखाती देशांमधून तेल खरेदी करतोय भारत प्रति दिन 4 7 दशलक्ष बॅरलची आयात
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

संयुक्त अरब अमिरात आणि सौदी अरब या देशांमधून भारताने ऑक्टोबरमध्ये मोठ्या प्रमाणात कच्च्या तेलाची आयात केली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. सदरची आयात ही गेल्या दहा महिन्यांतील सर्वाधिक असल्याचे सांगितले जात आहे. याच्या मागच्या महिन्याच्या तुलनेमध्ये ऑक्टोबरमध्ये तेलाची आयात 63 टक्के अधिक राहिली आहे. रशियामधून तेलाच्याबाबतीत सवलत कमी करण्यात आल्यानंतर भारतातील रिफायनरी कंपन्यांनी सौदी अरब आणि संयुक्त अरब अमिरात या देशांमधून कच्च्या तेलाची आयात केली आहे. ऑक्टोबरमध्ये रशियातून होणारी कच्च्या तेलाची आयात ही नऊ महिन्यांमध्ये सर्वात कमी राहिली आहे. भारत हा जगातला तिसरा सर्वात मोठा तेल आयातक देश मानला जातो. युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्धानंतर पश्चिमी देशांनी मास्कोतून कच्चे तेल खरेदी करणे बंद केले आहे. यानंतर दक्षिण आशियाई देशांमध्ये सवलतीत तेलाची विक्री केली जात असल्याने त्या देशातूनच आता कच्च्या तेलाची आयात केली जात आहे.

 किती होते तेलाची आयात

Advertisement

ऑक्टोबरमध्ये भारताने 4.7 दशलक्ष बॅरल प्रति दिन कच्च्या तेलाची आयात केली आहे. मागच्या महिन्याच्या तुलनेमध्ये 8.4 टक्के तेलाची आयात अधिक राहिली आहे. उत्सवी काळामध्ये देशात इंधनाची मागणी मोठ्या प्रमाणात राहिल्याने तेल खरेदीदारांनी कच्च्या तेलाची मोठ्या प्रमाणात आयात केली होती. भारताने ऑक्टोबर महिन्यामध्ये सरासरी प्रति दिवसाला 1.56 दशलक्ष बॅरल रशियातून तेलाची आयात केली आहे.

Advertisement
Tags :

.