कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

भारताने जगाला दाखवून दिले सामर्थ्य

06:08 AM May 07, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

28 हजार किमी प्रतितासाच्या वेगावर उपग्रहांची डॉगफाइट

Advertisement

अंतराळ क्षेत्रात भारताचा दबदबा सातत्याने वाढत आहे. चांद्रयान-3 पासून आदित्य एल-1 मोहीम राबवत भारताने स्वत:चे वर्चस्व सिद्ध केले आहे. जगभरातील देश स्वत:च्या उपग्रहाच्या प्रक्षेपणासाठी भारताची मदत घेत आहेत. इस्रोने उपग्रह प्रक्षेपणासाठी विश्वसनीय आणि अन्य देशांच्या तुलनेत सर्वात स्वस्त पर्याय सादर केला आहे. आता भारत अंतराळात जी मोहीम साकारत आहे, ते पाहून चीन आणि पाकिस्तानला मोठा झटका बसणार आहे. भारत पृथ्वीपासून सुमारे 500 किलोमीटर उंचीवर दोन उपग्रहांमध्ये डॉगफाइटचे संचालन करत आहे.

Advertisement

पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानसोबत तणाव वाढलेला असताना या डॉगफाइटविषयी माहिती समोर आली आहे. मागील वर्षी चीनने स्वत:च्या संरक्षण उपग्रहांदम्यान कनिष्ठ कक्षेत डॉगफाइट करविले होते, ज्याविषयी अमेरिकेने चिंता व्यक्त केली होती. ज्याप्रकारे दोन लढाऊ विमाने डॉगफाइट दरम्यान करतात तसेच अंतराळात उपग्रह डॉगफाइटदरम्यान करत असतात.

भारताची कमाल

इस्रोचे अध्यक्ष व्ही. नारायणन यांनी भारताच्या स्पॅडेक्स मिशनने दोनवेळा यशस्वी डॉकिंग आणि अनडॉकिंगची प्रक्रिया पार पाडली आहे. डॉकिंग आणि अनडॉकिंग सरावानंतर देखील दोन्ही उपग्रहांमध्ये 50 टक्के इंधन शिल्लक होते. या शिल्लक इंधनाचा वापर करत इस्रोने कक्षेत दोन उपग्रहांदरम्यान नजीकच्या समन्वयाशी निगडित एक नवे परीक्षण केले जे, अंतराळात मॉक डॉगफाइट्ससमान होते. हा प्रकार तांत्रिक स्वरुपात जटिल होता असे सांगण्यात आले.

कसे झाले परीक्षण?

अंतराळात सुमारे 28 हजार किलोमीटर प्रतितासाच्या वेगाने उ•ाण करणाऱ्या दोन भारतीय उपग्रहांनी एसडीएक्स01 आणि एसडीएक्स02 या अचूक उ•ाण पँटर्नमध्ये स्वायत्त स्वरुपात भाग घेतला. अलिकडेच दोन उपग्रहांदरम्यान डॉगफाइट झाली, जी त्यांच्या कक्षांना समायोजित करण्यासाठी अनेक दिवसांपर्यंत चाललेल्या मोहिमेनंतर झाली आहे. भारताच्या या सरावात खास बाब एक उपग्रह हीटिंग एलीमेंटसाठी दुसऱ्या उपग्रहाकडून ऊर्जा हस्तांतरण करणे होती. हस्तांतरणाचा कालावधी जवळपास 4 मिनिटे होता, जो अपेक्षेनुसार राहिला. दुसऱ्या डॉकिंग प्रयत्नात 3 मीटरच्या उपग्रह अंतरावर अतिरिक्त होल्ड पॉइंटचा मॅन्युअल स्वरुपात वापर करण्यात आला.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article