प्रत्युत्तर देण्याचा भारताला पूर्ण हक्क
विदेशमंत्र्यांचा मॉस्कोमधून दहशतवाद्यांना कठोर इशारा : दिल्ली स्फोटाची पार्श्वभूमी
वृत्तसंस्था/मॉस्को
भारताला दहशतवाद विरोधात स्वत:च्या लोकांचे रक्षण करण्याचा अधिकार असल्याचे वक्तव्य विदेशमंत्री एस. जयशंकर यांनी दिल्ली स्फोटाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी केले आहे. शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायजेशनची (एससीओ) स्थापना दहशतवाद, फुटिरवाद आणि कट्टरवाद या तिन्ही समस्यांना सामोरे जाण्यासाठी करण्यात आली होती हे आम्ही कधीच विसरू नये. मागील काही वर्षांमध्ये हे धेके आणखी गंभीर झाले आहेत. दहशतवादाच्या सर्व रुपांबद्दल जगाने शून्य सहिष्णूता दाखविणे आवश्यक असल्याचे विदेशमंत्र्यांनी मॉस्को येथील एससीओच्या बैठकीत बोलताना म्हटले आहे.
दहशतवादविरोधात भारत स्वत:ची कारवाई जारी ठेवत मजबुतीने प्रत्युत्तर देणार आहे. दहशतवादाचे कुठलेच औचित्य असू शकत नाही, तसेच याकडे कुणी डोळेझाक करू शकत नाही तसेच याप्रकरणी कुणी सारवासारव करू शकत नाही. दहशतवाद विरोधात स्वत:च्या लोकांचे रक्षण करण्याचा अधिकार असून आम्ही त्याचा वापर करणार आहोत असे जयशंकर यांनी अप्रत्यक्षपणे पाकिस्तानला सुनावले आहे. या बैठकीत पाकिस्तानचे विदेशमंत्री इशाक डारही उपस्थित
एससीओच्या कार्यप्रणाली व्हावा बदल
एससीओला बदलत्या जागतिक स्थितीच्या अनुकूल व्हावे लागेल, एक विस्तृत अजेंडा विकसित करावा लागेल आणि स्वत:च्या कार्यप्रणालीत सुधारणा करावी लागणार आहे. आम्ही या उद्देशांमध्ये सकारात्मक आणि पूर्ण योगदान देऊ असे जयशंकर यांनी म्हटले आहे. एससीओच्या बैठकीत सामील होण्यासाठी विदेशमंत्री जयशंकर हे सोमवारी मॉस्को येथे दाखल झाले होते.
कारवाईसाठी एकजूट
दहशतवादविरोधात कुठल्याही तडजोडीशिवाय एकजूट कारवाईसाठी भारत करत असलेल्या आवाहनाचा जयशंकर यांनी एससीओ नेत्यांना संबोधित करताना पुनरुच्चार केला आहे. दहशतवाद विरोधातील लढाई एक संयुक्त प्राथमिकता म्हणून कायम रहायला हवी असे जयशंकर यांनी म्हटले आहे.
रशियासोबत द्विपक्षीय चर्चा
मॉस्को येथे पोहोचताच जयशंकर यांनी रशियाचे विदेशमंत्री सर्गेई लावरोव यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांदरम्यान द्विपक्षीय सहकार्यासोबत एससीओ, ब्रिक्स, संयुक्त राष्ट्रसंघ आणि जी-20 शी निगडित क्षेत्रीय आणि जागतिक घटनाक्रमांवर चर्चा झाली आहे.