कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

भारताला दोन सुवर्णपदके जिंकण्याची संधी

06:26 AM Sep 07, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पुरुष कंपाऊंड संघ व मिश्र संघ अंतिम फेरीत, महिला संघाला अपयश

Advertisement

वृत्तसंस्था/ ग्वांगजू, दक्षिण कोरिया

Advertisement

भारतीय तिरंदाजांनी वर्ल्ड चॅम्पियनशिप मोहिमेची चमकदार सुरुवात केली असून पुरुषांच्या सांघिक कंपाऊंड आणि मिश्र सांघिकच्या अंतिम फेरीत स्थान मिळवून पदक निश्चित केले. पुरुष संघाने दडपणाखालीही संयमी खेळ करीत शूटऑफमध्ये ऑस्ट्रेलिया संघाचा, त्यानंतर अमेरिका संघाचा केवळ एका गुणाने तर तिसऱ्या मानांकित तुर्कीचा 2 गुणांनी पराभव करून सुवर्णपदकाच्या फेरीत स्थान मिळविले. सुवर्णपदकासाठी भारताची लढत फ्रान्सविरुद्ध होणार आहे.

वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये पदार्पण करणाऱ्या 23 वर्षीय रिषभ यादवने पात्रता फेरीत 709 गुण मिळवित भारतातर्फे सर्वोत्तम कामगिरी नेंदवली. नंतर त्याने मिश्र दुहेरीत ज्योती सुरेखा वेन्नमसमवेत जेतेपदाच्या फेरीत स्थान मिळवित दुहेरी मुकुट मिळविण्याची संधी प्राप्त केली. भारतीय जोडीने जर्मनी, एल साल्वादोर, चिनी तैपेई यांच्यावर एकतर्फी विजय मिळवित अंतिम फेरी गाठली. रिषभ यादव-ज्योती सुरेखा वेन्नम यांची सुवर्णपदकाची लढत नेदरलँड्सच्या जोडीशी होईल. ज्योतीने यापूर्वी 2021 मधील यांक्टन येथे झालेल्या स्पर्धेत मिश्र सांघिकमध्ये अभिषेक शर्मासमवेत रौप्यपदक मिळविले होते. आता त्यापुढे मजल मारण्याची तिचा मनोदय आहे. ती सातव्यांदा वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत सहभागी झाली आहे.

त्याआधी पात्रता फेरीत यादवने मिळविलेल्या 709 गुणांमुळे भारताला दुसरे मानांकन मिळाले. त्याचे सहकारी अमन सैनीने (707, 15 वे मानांकन), प्रथमेशने फुगेने (706, 19 वे स्थान) गुण नोंदवले. त्यांनी पहिल्या फेरीत आठव्या मानांकित ऑस्ट्रेलियन संघाशी 232-232 असे टाय झाल्यानंतर शूटऑफमध्ये 30-28 असा विजय मिळविला. दुसऱ्या फेरीत बलाढ्या अमेरिकेचा 234-233 असा केवळ एका गुणाने पराभव केल्यानंतर पुढच्या फेरीत पिछाडीवर पडल्यानंतरही तुर्कीला 234-232 असा पराभवाचा धक्का देत अंतिम फेरी गाठली.

मिश्र सांघिकमध्ये ज्योती-यादव यांना पात्रता फेरीनंतर चौथे मानांकन मिळाले. त्यांनी निर्दोष प्रदर्शन करीत 16 तीरापासून 160 पैकी 160 गुण मिळवित जर्मनीवर 160-152 अशी मात केली. नंतर दोन फेऱ्यांत भारतीय जोडीने केवळ तीन गुण गमवित अंतिम फेरी गाठली. महिलांच्या सांघिक विभागात मात्र ज्योतीची निराशाजनक कामगिरी झाली. त्यामुळे 2023 मध्ये बर्लिन येथे झालेल्या स्पर्धेत मिळविलेले महिलांचे सांघिक सुवर्णपदक भारताला राखता येणार नाही. तिसऱ्या मानांकित ज्योती, परनीत कौर पृथिक प्रदीप यांना उपउपांत्यपूर्व फेरीत 14 व्या मानांकित इटलीकडून 229-233 असा पराभव स्वीकारावा लागला.

 

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article