कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

भारताला रशियाकडून मिळाला ‘आकाशाचा रक्षक’

06:11 AM May 05, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

शत्रूचा क्षणार्धात होणार खात्मा

Advertisement

नवी दिल्ली

Advertisement

पाकिस्तानसोबतच्या तणावादरम्यान भारतीय सैन्याच्या ताफ्यात महत्त्वपूर्ण प्रणालीचा समावेश झाला आहे. सैन्याला अलिकडेच रशियन बनावटीच्या इग्ला-एस हवाई सुरक्षा क्षेपणास्त्रs प्राप्त झाली आहेत. ही क्षेपणास्त्रs कमी पल्ल्याच्या हवाई सुरक्षा प्रणालीचा हिस्सा असून सैन्याचे हवाई हल्ल्यांपासून रक्षण करण्याची क्षमता आणखी मजबूत करणार आहे. सरकारकडून सैन्याला देण्यात आलेल्या आपत्कालीन खरेदी अधिकारांच्या अंतर्गत या प्रणालीसाठी करार करण्यात आला होता. सुमारे 260 कोटी रुपयांच्या या कराराच्या अंतर्गत प्राप्त क्षेपणास्त्रांना सीमेवर तैनात सैनिकांकडे सोपविले जात असून याद्वारे शत्रूचे लढाऊ विमान, हेलिकॉप्टर आणि ड्रोनपासून रक्षण केले जाणार आहे.

भारतीय वायुदलाने देखील अशाचप्रकारच्या इन्फ्रारेड आधारित व्हीशोरॅड्स क्षेपणास्त्रांच्या खरेदीचा निर्णय घेतला आहे. सैन्य आणि वायुदल मागील काही वर्षांपासून आपत्कालीन आणि जलदगती खरेदी प्रक्रियांद्वारे स्वत:च्या शस्त्रागाराला मजबूत करत आहेत.

नव्या इग्ला-एस क्षेपणास्त्रांना तैनात करण्यासोबत सैन्याने 48 नवे लाँचर आणि 90 अतिरिक्त क्षेपणास्त्रांच्या खरेदीसाठी देखील निविदा जारी केली आहे. तसेच सैन्य आता लेझर बीम-रायडिंग व्हीशोरस्स सिस्टीमही लवकर प्राप्त करण्याची योजना आखत आहे. इग्ला-एस जुन्या इग्ला मिसाइल सिस्टीमचे अत्याधुनिक वर्जन आहे, ही सिस्टीम 1990 च्या दशकापासून भारतीय सैन्याकडून वापरली जात आहे. सैन्याने स्वत:च्या जुन्या क्षेपणास्त्र साठ्याला देखील भारताच्या एका कंपनीच्या माध्यमातून अपग्रेड करविले आहे.

ड्रोन हल्ले रोखण्याचे तंत्रज्ञान

पश्चिम सीमेवर पाकिस्तान सैन्याकडून ड्रोनचा वाढता वापर पाहता भारतीय सैन्याला प्रभावी ड्रोनची ओळख पटविणारे आणि नष्ट करणाऱ्या तंत्रज्ञानाची आवश्यकता आहे. याचमुळे सैन्याने स्वदेशी इंटीग्रेटेड ड्रोन डिटेक्शन अँड इंटरडिक्शन सिस्टीम (आयडीडीआयएस) मार्क-1 ला तैनात केले आहे. ही सिस्टीम 8 किलोमीटरपेक्षा अधिक अंतरापर्यंतच्या ड्रोनला जाम करत नष्ट करू शकते. या सिस्टीममध्ये लेझर तंत्रज्ञानाचा वापर झाला असून ते ड्रोनला जाळून पाडवू शकते. अलिकडेच जम्मू क्षेत्राच्या 16 कॉर्प्स एरियामध्ये सैन्याने याच तंत्रज्ञानाद्वारे एक पाकिस्तानी ड्रोन पाडविला होता.

 

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article