कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

विश्वचषक नेमबाजीत भारताला तिसरे स्थान

06:06 AM Jun 17, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

Advertisement

आयएसएसएफच्या म्युनिक येथे झालेल्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत भारतीय नेमबाजांनी दोन सुवर्णपदकांची कमाई केल्याने या स्पर्धेत भारताने पदक तक्त्यात तिसरे स्थान मिळविले. या स्पर्धेत भारतीय नेमबाजांना अव्वल नेमबाजांकडून कडव्या प्रतिकाराला तोंड द्यावे लागले.

Advertisement

2025 च्या नेमबाजी हंगामात आयएसएसएफतर्फे चार विश्वचषक नेमबाजी स्पर्धा भरविल्या जातात. आतापर्यंत भारताने या वर्षीच्या हंगामातील पहिल्या तीन स्पर्धांमध्ये पदक तक्त्यात पहिल्या तीन देशांत स्थान मिळविले. या कामगिरीमुळे निश्चितच भारताची मानांकनात सुधारणा दिसून येते. म्युनिकमध्ये सदर विश्वचषक नेमबाजी स्पर्धा ऑलिम्पिक नेमबाजी संकुलामध्ये घेतली गेली. 1972 साली म्युनिकमध्ये ऑलिम्पिक स्पर्धा भरविली गेली होती. रायफल आणि पिस्तुल नेमबाजी प्रकारात भारतीय स्पर्धकांनी पुन्हा एकदा अव्वल कामगिरी केली असल्याने अखिल भारतीय रायफल संघटनेचे सरचिटणीस के. सुलतानसिंग यांनी भारतीय नेमबाजांचे कौतुक केले आहे.

भारताची महिला नेमबाज सुरुची सिंग हिने महिलांच्या 10 मी. एअर पिस्तुल नेमबाजी प्रकारात सुवर्णपदकाला गवसणी घातली. हरियाणाच्या सुरुची सिंगने ब्युनोस आयरीस येथे झालेल्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत आपले आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. त्याचप्रमाणे म्युनिक विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत भारताच्या आर्या बोरसे आणि अर्जुन बबुता यांनी चीनच्या अव्वल स्पर्धकांना मागे टाकत मिश्र सांघिक 10 मी. एअर रायफल नेमबाजीत सुवर्णपदक पटकाविले. त्याचप्रमाणे म्युनिकमधील स्पर्धेत भारताच्या इलावेनील वलरिवनने महिलांच्या 10 मी. एअर रायफल नेमबाजीत कांस्यपदक तसेच महिलांच्या 50 मी. रायफल थ्री पोझीशन नेमबाजी प्रकारात सिफ्त कौर सामराने कांस्यपदके मिळविली. म्युनिकमधील स्पर्धेत पदकतक्त्यात चीनने पहिले स्थान मिळविताना 4 सुवर्णांसह एकूण 7 पदकांची कमाई केली असून नॉर्वेने दोन सुवर्ण, एक रौप्य आणि दोन कांस्य पदकांसह दुसरे स्थान तर भारताने दोन सुवर्ण आणि 2 कांस्यपदकांसह तिसरे स्थान घेतले. आता आयएसएसएफची पुढील विश्वचषक नेमबाजी स्पर्धा जुलै महिन्यात इटलीमध्ये होणार आहे. त्याचप्रमाणे चौथी आणि शेवटची रायफल व पिस्तुल विश्वचषक नेमबाजी स्पर्धा चीनमध्ये सप्टेंबरामध्ये आयोजित केली आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article