For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पहिल्या दिवशी भारताला अपयश

06:12 AM Oct 21, 2025 IST | Tarun Bharat Portal
पहिल्या दिवशी भारताला अपयश
Advertisement

वृत्तसंस्था/ नोवि साद, सर्बिया

Advertisement

येथे सुरु असलेल्या यू-23 वर्ल्ड चॅम्पियनशिप कुस्ती स्पर्धेच्या पहिल्या दिवशी भारताच्या चारही ग्रीको-रोमन मल्लांना पराभवाला सामोरे जावे लागले. गौरव (63 किलो), अंकित (77 किलो), रोहित बुरा (87 किलो) व जोगिंदर राठी (130 किलो) या चौघांचा त्यात समावेश आहे.

पहिल्या दिवशी भारताच्या एकाही मल्लांना लढत जिंकता आली नाही. गौरवला किर्गीझच्या कुतुबेक ए अब्दुरझाकोव्हकडून तांत्रिक सरसतेवर पराभव स्वीकारावा लागला. अंकितलाही याच पद्धतीने सर्बियाच्या झालन पेककडून हार पत्करावी लागली तर रोहित पात्रता फेरीतच अमेरिकेच्या पेटन जे. जेकब्सनकडून 0-9 अशा गुणांनी पराभूत झाला. जोगिंदरलाही पात्रता फेरीत उझ्बेकच्या दामिरखोन रखमातोव्हकडून चीतपट झाला. भारताच्या सर्व मल्लांचे भवितव्य आता त्यांना पराभूत करणाऱ्या मल्लांया प्रगतीवर अवलंबून असेल.

Advertisement

Advertisement
Tags :

.