कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

भारत - इंग्लंड तिसरी कसोटी आजपासून

06:58 AM Jul 10, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मालिकेत आघाडीचे पाहुण्यांसमोर लक्ष्य, भारतीय फलंदाजांची लॉर्ड्सवर लागणार कसोटी, बुमराह, जोफ्रा आर्चरचे पुनरागमन

Advertisement

वृत्तसंस्था/ लंडन

Advertisement

भारताने दुसरी कसोटी जिंकून मालिका बरोबरीत आणल्यानंतर आज बुधवारपासून लॉर्ड्सवर भारत व इंग्लंड यांच्यातील तिसरी कसोटी सुरू होत असून फॉर्ममध्ये असलेले भारतीय फलंदाज संभाव्य आव्हानात्मक मैदानावर यशस्वी होण्यासाठी प्रयत्नरत राहतील, तर पहिल्या सामन्यात फारसा प्रभावी न वाटलेला गोलंदाजी मारा जसप्रीत बुमराहच्या पुनरागमनामुळे अस्थिर यजमानांसमोर अधिक कठीण परीक्षा उभी करेल.

तिसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी मालिका 1-1 अशी चांगली स्थितीत असल्याने आणि एजबॅस्टन येथे भारताने इंग्लंडला 336 धावांनी हरवल्याने दोन्ही संघांभोवतीची परिस्थिती लक्षणीयरीत्या बदलली आहे. जर लीड्समध्ये झेल सोडले गेले नसते आणि खालच्या फळीला अपयश आले नसते, तर भारत पाच सामन्यांच्या मालिकेत 2-0 ने पुढे राहिला असता. नवीन कर्णधार शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला फारसा अनुभव नाही हे लक्षात घेता संघाने दोन कसोटी सामन्यांमध्ये केवळ चांगली स्पर्धाच केलेली नाही, तर बहुतेक सत्रे जिंकली आहेत.

दुसरीकडे, रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या निवृत्तीनंतर इंग्लंड जोरदार टक्कर देईल अशी अपेक्षा होती, परंतु आतापर्यंतची भारताची कामगिरी त्यांची खोली आणि समृद्ध प्रतिभेची साक्ष देते. गिल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी उभारलेल्या धावांच्या डोंगरामुळे बेन स्टोक्सला त्यांच्या मूळ धोरणापासून म्हणजे पाटा खेळपट्ट्या तयार करणे आणि फलंदाजीच्या जोरावर विरोधी संघाचे आव्हान संपुष्टात आणणे या धोरणापासून दूर जावे लागले आहे.

पाटा खेळपट्ट्यांवर भारतीय फलंदाजांचे यश यजमानांसाठी प्रतिकूल ठरले आहे. त्यांच्याकडून आता वेगवान गोलंदाजीस मदत करणारी खेळपट्टी तयार केली जाण्याची अपेक्षा आहे. त्यात प्रतिष्ठित लॉर्ड्सवर उताराचे एक वेगळे आव्हान असेल. चार वर्षांत इंग्लंडसाठी पहिली कसोटी खेळणार असलेला जोफ्रा आर्चर आणि बुमराह यांचे पुनरागमन फलंदाजांसाठी कठीण आव्हान उभे करेल. भारताच्या फलंदाजी विभागात कऊण नायरचा फॉर्म वगळता पाहुण्यांना काळजी करण्याची फारशी गरज नाही. नायर उसळणाऱ्या चेंडूंविऊद्ध थोडा अस्वस्थ दिसलेला आहे.

इंग्लंडकडून आज यशस्वी जैस्वालवरही आखूड टप्प्याच्या चेंडूंचा मारा होण्याची शक्यता आहे. परंतु तो नेहमीप्रमाणे धावा काढण्याचा मार्ग शोधेल. भारताच्या अंतिम संघात प्रसिद्ध कृष्णाच्या जागी बुमराहचा समावेश अपेक्षित आहे. लीड्सनंतर भारतीय वेगवान गोलंदाजांच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले होते, परंतु आकाश दीप, मोहम्मद सिराज आणि बुमराह हे त्रिकूट आक्रमक गोलंदाजीला एक प्रभावी रूप देते. दुसऱ्या कसोटीत 10 बळी मिळवून आकाश दीपने इंग्लंडमध्ये स्वप्नवत पदार्पण केले आणि नेहमीच यष्ट्यांवर रोखून ठेवून मारा करण्याची त्याची आवड लक्षात घेता यजमानाच्या फलंदाजांना या धूर्त गोलंदाजाविऊद्ध अधिक सावधगिरी बाळगावी लागेल. 2021 मध्ये लॉर्ड्सवर सिराजने विजय मिळवून देणारी कामगिरी केली होती. त्याला त्या प्रयत्नातून आत्मविश्वास मिळेल, तर बुमराह हा अगदी पाटा खेळपट्टी असली, तरी नेहमी धोकादायक राहतो.

भारताने एजबॅस्टनमध्ये तीन अष्टपैलू खेळाडू खेळवले, ज्यात रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर या दोन फिरकीपटूंचा समावेश होता. त्यात नितीश रे•ाr हा एकमेव वेगवान गोलंदाजी करणारा अष्टपैलू खेळाडू असल्याने ही रचना कायम राहण्याची शक्यता आहे. रे•ाrचे प्राथमिक कौशल्य फलंदाजी आहे. ‘सध्या मालिका 1-1 अशी बरोबरीत आहे, परंतु मालिकेतील सर्वोत्तम गोलंदाज भारताचे आहेत. बुमराह इतर कोणत्याही गोलंदाजांपेक्षा खूपच चांगला आहे, परंतु मागील कसोटीत आकाश दीपने आणि सिराजने ज्या प्रकारे गोलंदाजी केली ते पाहता ते उत्कृष्ट होते आणि भारताकडे बळी मिळवू शकणारे तीन वेगवान गोलंदाज असणे ही मोठी लाभदायक गोशट आहे. सध्या इंग्लंडसाठी ही चिंतेची बाब आहे, असे इंग्लंडचा माजी वेगवान गोलंदाज डॅरेन गॉफने सांगितले. जोश टंगची जागा घेणाऱ्या आर्चरच्या पुनरागमनामुळे इंग्लंडचा मारा मजबूत होईल.

फलंदाजीच्या आघाडीवर एजबॅस्टनमध्ये दोन वेळा अपयश आल्यानंतर सलामीवीर झॅक क्रॉलीवर दबाव असेल, तर कर्णधार बेन स्टोक्सच्या फलंदाजीतून अधिक धावा अपेक्षित आहेत. त्याला गोलंदाजीत लय मिळवण्यासाठी जास्त वेळ लागला नाही, परंतु त्याच्या फलंदाजीबद्दल तसे म्हणता येत नाही. आतापर्यंत मालिकेत प्रेक्षकांची उपस्थिती भरपूर राहिली आहे आणि लॉर्ड्सवर देखील सारी तिकिटे खपून गर्दी होण्याची अपेक्षा आहे.

संघ : भारत : शुभमन गिल (कर्णधार), रिषभ पंत (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, के. एल. राहुल, साई सुदर्शन, अभिमन्यू ईश्वरन, कऊण नायर, नितीश रे•ाr, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराहृ मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, आकाश दीप, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव.

इंग्लंड : बेन स्टोक्स (कर्णधार), झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, ज्यो रूट, हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ, ख्रिस वोक्स, ब्रायडन कार्स, जोफ्रा आर्चर, शोएब बशिर.

सामन्याची वेळ : दुपारी 3.30 वा. (भारतीय वेळेनुसार)

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article