महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

भारताकडून अरबी समुद्रात 3 युद्धनौका तैनात

06:23 AM Dec 27, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

जहाजांवरील हल्ले रोखण्यासाठी उचलले पाऊल : देखरेखीसाठी विमानाची मदत

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

भारतीय नौदलाने अरबी समुद्रात 3 युद्धनौका तैनात केल्या आहेत. यात आयएनएस मोरमुगाओ, आयएनएस कोलकाता, आयएनएस कोची यांचा समावश आहे. याचबरोबर सातत्याने टेहळणी आणि सागरी क्षेत्राविषयी अधिक माहिती मिळविण्यासाठी पी-8आय विमान देखील तैनात करण्यात आले आहे.

23 डिसेंबर रोजी मंगळूर येथे येत असलेल्या केम प्लूटो या व्यापारी जहाजावर हिंदी महासागरात ड्रोनने हल्ला करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर नौदलाने हे पाऊल उचलले आहे. याचबरोबर नौदलाचे पश्चिम कमांड मेरीटाइम ऑपरेशन सेंटर देखील अन्य यंत्रणा आणि तटरक्षक दलासोबत या भागात नजर ठेवून आहेत.

केम प्लूटो जहाज सोमवारी मुंबईच्या किनाऱ्यानजीक पोहोचले. यानंतर नौदलाने या जहाजाची पाहणी केली होती. भारताच्या किनाऱ्यापासून 400 किलोमीटर अंतरावर असताना या जहाजावर हल्ला झाला होता. जहाजावर मिळालेले अवशेष पाहता त्यावर ड्रोनने हल्ला करण्यात आला होता याची पुष्टी मिळते असे नौदलाने म्हटले आहे.

फोरेन्सिक तपासणी होणार

या जहाजाच्या चालक दलाच्या सदस्यांची संख्या 21 इतकी होती, यातील 20 भारतीय तर एक जण व्हिएतनामचा नागरिक होता. जहाजावर फोरेन्सिक तपासणी करत हल्ला किती अंतरावरून, कोणत्या स्फोटकांचा वापर करून करण्यात आला होता याचा थांगपत्ता लावण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. तपासणी पूर्ण झालयावर जहाजावरील सामग्री हलविण्यात येणर आहे. यानंतर जहाजाची दुरुस्ती आणि पुनर्वापर करण्यासाठी ते कंपनीला सोपविण्यात येईल. भारतयी तटरक्षक दलाच्या आयसीजीएस विक्रम या नौकेने केम प्लूटोला सुरक्षा पुरवत मुंबईच्या किनाऱ्यानजीक आणले होते. ड्रोन हल्ल्यानंतर जहाजावर आग लागल्याने चालक दलाला समस्यांना तोंड द्यावे लागले होते.

इराणच्या भूमीवरून हल्ला

केम प्लुटोवर इराणच्या भूमीवरून हल्ला झाला होता असा दावा अमेरिकेच्या संरक्षण विभागाने केला होता. मेरीटाइम कंपनी ऑम्ब्रेनुसार थेट इराणमधून करण्यात आलेला हा अशाप्रकारचा पहिला हल्ला आहे. परंतु इराणने स्वत:वरील आरोप फेटाळले आहेत. केम प्लुटो हे जहाज सौदी अरेबियातून भारताच्या दिशेने येत होते. या जहाजावर शनिवारी सकाळी 10 वाजता हल्ला झाला होता. त्यावेळी हे जहाज अमेरिकेच्या संपर्कात होते. जपानी मालकी आणि नेदरलँडकडून संचालित होणारे हे जहाज आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews
Next Article