कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

भारत लवकरच आयफोन कंट्री

06:22 AM May 03, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

अॅपलचे सीईओ टीम कुक यांनी व्यक्त केला विश्वास : 2026 पर्यंत 6 कोटींहून अधिकची आयफोन निर्मिती

Advertisement

वृत्तसंस्था/ मुंबई 

Advertisement

अलिकडच्या मुलाखतीत, अॅपलचे सीईओ टिम कुक म्हणाले की, अमेरिकन बाजारपेठेत विकल्या जाणाऱ्या 50 टक्के आयफोन भारतात बनवले जात आहेत. तसेच एप्रिल-जून तिमाहीत अमेरिकेत विकल्या जाणाऱ्या आयफोनसाठी भारत हा मुख्य देश बनणार असल्याचा दावाही कुक यांनी केला आहे. चीनमधील उच्च टॅरिफच्या तुलनेत भारत आणि व्हिएतनाममधून आयातीवर फक्त 10 टक्के कर आहे. चीनवरील उच्च टॅरिफमुळे उत्पादन भारतात हलवले गेले अमेरिका आणि चीनमधील व्यापार युद्ध तीव्र झाले असताना हा निर्णय घेण्यात आला आहे. सीईओ कुक यांनी असा दावा केला की, मार्च तिमाहीत अॅपलवर याचा मर्यादित परिणाम झाला, कारण कंपनीने त्यांची पुरवठा साखळी वेगाने भारत आणि व्हिएतनाममध्ये हलवली.

2026 पर्यंत, देशात दरवर्षी 6 कोटींहून अधिक आयफोन तयार केले जातील. फायनान्शियल टाईम्सच्या अहवालानुसार, अॅपल चीनवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी गेल्या काही काळापासून त्यांची पुरवठा साखळी चीनबाहेर हलवण्यावर काम करत आहे. जर अॅपलने या वर्षाच्या अखेरीस त्यांची असेंब्ली भारतात हलवली तर ते 2026 पासून दरवर्षी 6 कोटींहून अधिक आयफोन तयार करेल. हे सध्याच्या क्षमतेपेक्षा दुप्पट आहे.

चीनचे अजूनही आयफोन उत्पादनावर का वर्चस्व?

आयडीसीच्या मते, 2024 मध्ये कंपनीच्या जागतिक आयफोन शिपमेंटमध्ये त्याचा वाटा सुमारे 28 टक्के होता. अमेरिकन बाजारपेठेत चीनबाहेर विकल्या जाणाऱ्या आयफोनचे उत्पादन हलवल्याने कंपनीला उच्च शुल्क टाळण्यास मदत होईल.

मार्च-24 ते मार्च-25 या कालावधीत आयफोनचे उत्पादन 60 टक्के वाढले

मार्च 2024 ते मार्च 2025 या 12 महिन्यांत, अॅपलने भारतात 22 अब्ज डॉलर्स (अंदाजे 1.88 लाख कोटी) किमतीचे आयफोन बनवले. गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यात 60 टक्के वाढ झाली आहे.

या कालावधीत, अॅपलने भारतातून 17.4 अब्ज डॉलर्स (अंदाजे 1.49 लाख कोटी) किमतीचे आयफोन निर्यात केले. त्याच वेळी, जगातील प्रत्येक 5 आयफोनपैकी एक आयफोन आता भारतात बनवला जात आहे. भारतात आयफोनचे उत्पादन तामिळनाडू आणि कर्नाटकमधील कारखान्यांमध्ये केले जाते. फॉक्सकॉन त्याचे सर्वाधिक उत्पादन करते. फॉक्सकॉन हा अॅपलचा सर्वात मोठा उत्पादन भागीदार आहे. याशिवाय, टाटा इलेक्ट्रॉनिक्स आणि पेगाट्रॉन देखील उत्पादन करतात.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article