कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

भारताने ‘चिनाब’चे पाणी रोखले!

06:58 AM May 05, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बागलिहार धरणात अडवले, झेलम नदीचा प्रवाहही थांबविण्याची योजना : पाकिस्तानात ‘पाणी-बाणी’चे संकेत

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली, श्रीनगर

Advertisement

पाकिस्तानविरोधात कठोर धोरण स्वीकारत भारताने चिनाब नदीवरील बागलिहार धरणातून पाकिस्तानला जाणारा पाण्याचा प्रवाह थांबवला आहे. तसेच नजिकच्या काळात झेलम नदीवरील किशनगंगा धरणावरही असेच पाऊल उचलण्याचे नियोजन आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानसोबतचा 65 वर्षे जुना सिंधू जलवाटप करार स्थगित केला आहे. पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारताने राजनैतिकदृष्ट्या उचललेले हे सर्वात मोठे पाऊल मानले जात आहे.

जम्मू कश्मीरमधील बागलिहार जलविद्युत प्रकल्प पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तानमधील वादाचा केंद्रबिंदू ठरला आहे. भारताने सिंधू पाणी वाटप करार रद्द केल्यानंतर आता चिनाब नदीचे पाणी बागलिहार धरणाद्वारे रोखण्याचा निर्णय भारताने घेतला आहे. पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर आणखी एक मोठे पाऊल उचलताना भारताने ही कारवाई केली आहे.

भारत जम्मूतील रामबन येथील बागलिहार जलविद्युत धरण आणि उत्तर काश्मीरमधील किशनगंगा जलविद्युत धरणातून आपल्या बाजूने पाणी सोडण्याच्या वेळेचे नियमन करू शकतो. या धरणांमधून पाकिस्तानला पोहोचणारे पाणी कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय कमी करता येते. तसेच प्रवाह वाढवताही येतो. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने दशकांपूर्वीचा हा करार स्थगित केला होता.

1960 मध्ये जागतिक बँकेच्या मध्यस्थीने भारत आणि पाकिस्तानमध्ये सिंधू पाणी करार झाला. याअंतर्गत, सिंधू नदी आणि तिच्या उपनद्यांचे पाणी दोन्ही देशांमध्ये विभागण्याचा निर्णय घेण्यात आला. चिनाब नदीवरील बागलिहार धरण देखील दोन्ही शेजारी देशांमधील वादाचा मुद्दा आहे. पाकिस्तानने यापूर्वी या प्रकरणात जागतिक बँकेकडे मध्यस्थी मागितली होती. त्याचप्रमाणे, किशनगंगा धरणालाही कायदेशीर आणि राजनैतिक तपासणीचा सामना करावा लागला आहे.

या करारानुसार पाकिस्तानला सिंधू प्रणालीच्या पश्चिमेकडील सिंधू, चिनाब आणि झेलम या नद्यांवर नियंत्रण देण्यात आले आहे. पाकिस्तान सिंधू नदी प्रणालीतील सुमारे 93 टक्के पाणी सिंचन आणि वीज निर्मितीसाठी वापरतो आणि शेजारच्या देशाची सुमारे 80 टक्के शेती जमीन या पाण्यावर अवलंबून आहे. पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेत शेतीची भूमिका महत्त्वाची आहे. साहजिकच भारताने हा करार स्थगित केल्यानंतर पाकिस्तान सतत युद्धाच्या धमक्या देत आहे.

पाकिस्तानचा यापूर्वीही आक्षेप

बागलिहार धरण हा भारत आणि पाकिस्तानमधील अनेक वर्षांपासूनचा वादाचा मुद्दा आहे. पाकिस्तानने यापूर्वीही याबाबत आंतरराष्ट्रीय स्तरावर विशेषत: जागतिक बँकेकडे मध्यस्थीची मागणी केली होती. त्याचप्रमाणे, किशनगंगा प्रकल्पामुळे झेलमची उपनदी असलेल्या नीलम नदीच्या प्रवाहावर होणाऱ्या परिणामांविषयीही पाकिस्तानने आक्षेप नोंदवले आहेत.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article