महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

भारत, बेल्जियम पुरुष हॉकी संघ उपांत्यपूर्व फेरीत

06:46 AM Aug 01, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ पॅरिस

Advertisement

भारत व बेल्जियम यांनी पॅरिस ऑलिम्पिक हॉकी प्रकारात बाद फेरी गाठली आहे. अर्जेन्टिनाने न्यूझीलंडचा आणि बेल्जियमने ऑस्ट्रेलियाचा पराभव केल्यानंतर या दोन संघांचे उपांत्यपूर्व फेरीतील स्थान निश्चित झाले.

Advertisement

या सर्व संघांचा गट ब मध्ये समावेश असून भारताने मंगळवारी आयर्लंडचा 2-0 असा पराभव करून पदक मिळविण्याच्या दिशेने पाऊल टाकले आहे. अर्जेन्टिनाने न्यूझीलंडचा 2-0 असा पराभव केल्यानंतर भारताची उपांत्यपूर्व फेरी निश्चित झाली. या निकालानंतर भारताला गटा अव्वल स्थान मिळाले होते. पण बेल्जियमने नंतर ऑस्ट्रेलियाला 6-2 असा दणका देत भारताने मागे सारून गटात अव्वल स्थान मिळविले. त्यामुळे भारत आता 7 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. अग्रस्थान मिळविणाऱ्या बेल्जियमचे 9 गुण झाले आहेत. आता अर्जेन्टिना व न्यूझीलंड यांच्यात गटातील चौथ्या स्थानासाठी चुरस लागणार आहे. प्रत्येक गटातील चार संघ उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरतात.

भारताने पहिल्या सामन्यात न्यूझीलंडवर 3-2 अशी मात केल्यानंतर अर्जेन्टिनाविरुद्ध 1-1 अशी बरोबरी साधली. तिसऱ्या सामन्यान भारताने आयर्लंडवर 2-0 अशी मात केली. भारताचा पुढील सामना आज गुरुवारी विद्यमान चॅम्पियन बेल्जियमविरुद्ध तर शुक्रवारी शेवटचा गट साखळी सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#sports
Next Article