For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारत-बांगलादेश चौथा सामना आज

06:38 AM May 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
भारत बांगलादेश चौथा सामना आज
Advertisement

वृत्तसंस्था/ सिलेत

Advertisement

भारतीय महिला क्रिकेट संघ सध्या बांगलादेशच्या दौऱ्यावर 5 सामन्यांची टी-20 मालिका खेळत आहे. या मालिकेतील चौथा सामना येथे सोमवारी खेळविला जाणार आहे. भारतीय महिला संघाने या मालिकेत यापूर्वी सलग 3 सामने जिंकून यजमान बांगलादेशवर 3-0 अशी विजयी आघाडी मिळविली आहे. आता भारतीय संघ या मालिकेत बांगलादेशचा व्हाईटवॉश करण्यासाठी सज्ज झाला आहे.

सोमवारच्या या सामन्याला भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 3.30 वाजता प्रारंभ होईल. पहिल्या 3 सामन्यांमध्ये भारतीय संघाने सांघिक खेळावरच विजय नोंदविले आहेत. या 3 सामन्यात भारतातर्फे एकमेव अर्धशतक शेफाली वर्माने पहिल्या लढतीत नोंदविले होते. स्मृती मानधना आणि कर्णधार हरमनप्रित कौर फलंदाजीचा सूर मिळविण्यासाठी प्रयत्न करतील. या मालिकेत भारतातर्फे शेफाली वर्मा हिने 3 सामन्यातून सर्वाधिक म्हणजे 82 धावा नोंदविल्या आहेत. पुढील महिन्यात भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात क्रिकेटच्या तीनही प्रकारातील मालिका होणार असून ही मालिका भारतीय संघासाठी सरावाच्या दृष्टीकोनातून महत्त्वाची आहे. येत्या ऑक्टोबर महिन्यात महिलांची टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा होणार असून भारतीय संघाची या स्पर्धेसाठी पुनर्बांधणी प्रक्रिया सुरु आहे. भारतीय क्रिकेट मंडळाने आपल्या संघासाठी बांगलादेशचा दौरा निश्चित केल्यानंतर भारतीय संघातील फलंदाजांना या दौऱ्यापासून बरेच काही शिकता येईल. विदेशातील वातावरण आणि खेळपट्ट्या यांचा अनुभव मिळावा या हेतूने भारतीय संघाकरीता हा दौरा महत्त्वाचा राहिल. भारतीय गोलंदाज बांगलादेशमधील खेळपट्ट्यांवर थोडेफार प्रभावी ठरत आहेत. फिरकी गोलंदाज राधा यादवने या मालिकेत आतापर्यंत सर्वाधिक म्हणजे 6 गडी बाद केले आहेत. भारतीय संघातील गोलंदाज श्रेयांका पाटील, रेणुकासिंग ठाकुर आणि पूजा वस्त्रकर यांनी प्रत्येकी 4 बळी या मालिकेत मिळविले आहेत.

Advertisement

बांगलादेशची फिस्त प्रामुख्याने कर्णधार निगार सुलतानावर आहे. मात्र तिला इतर सहकाऱ्यांकडून साथ मिळणे गरजेचे आहे. दिलारा अख्तर आणि फहिमा खातून हे या संघातील प्रमुख खेळाडू आहेत.

भारत : स्मृती मानधना, प्रेमलता, हरमनप्रित कौर (कर्णधार), दिप्ती शर्मा, एस. सजना, शेफाली वर्मा, श्रेयांका पाटील, अमनज्योत कौर, पूजा वस्त्रकार, आशा शोभना, यास्तिका भाटीया, रिचा घोष, राधा यादव, रेणुकासिंग ठाकुर, तितास साधू आणि सायका इशाक.

बांगलादेश : मुर्शीदा खातून, रुबिया हैदर, शोभना मोस्तरी, शोर्णा अख्तर, शोरिफा खातून, निगार सुलताना (कर्णधार), दिलारा अख्तर, नाहिदा अख्तर, सुल्ताना खातून, रितू मोनी, रबिया खान, फहिमा खातून, मारुफा अख्तर, फरिआ त्रिष्णा आणि हबिबा इस्लाम.

Advertisement
Tags :

.