कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

भारत-आस्ट्रेलिया महिला हॉकी लढत आज

06:01 AM May 03, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था / पर्थ

Advertisement

भारतीय महिला हॉकी संघ सध्या ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर असून या दौऱ्यात उभय संघात पाच सामने खेळविले जात आहेत. दरम्यान भारतीय महिला हॉकी संघाला सलग तीन सामन्यांत हार पत्करावी लागली आहे. आता भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला हॉकी संघातील चौथा सामना शनिवारी खेळविला जात आहे.

Advertisement

सलिमा टेटेच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला हॉकी संघाला ऑस्ट्रेलियाचा दौरा खरोखरच खडतर ठरला आहे. या दौऱ्यात भारतीय महिला हॉकी संघाच्या दर्जाची परीक्षा होत आहे. या दौऱ्यातील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलिया अ महिला संघाने भारताचा 5-3 तर दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलिया अ महिला संघाने भारताचा 3-2 अशा गोल फरकाने पराभव केला. गुरुवारी झालेल्या या दौऱ्यातील तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या वरिष्ठ महिला हॉकी संघाने भारतावर 2-0 असा एकतर्फी विजय मिळविला. आता या मालिकेतील दोन सामने बाकी असून भारतीय महिला हॉकी संघ किमान एका विजयाची नोंद करण्यासाठी प्रयत्नशील राहील. पुढील वर्षी महिलांची विश्व़ चषक हॉकी स्पर्धा तसेच पुढील महिन्यात महिलांची प्रो लीग हॉकी स्पर्धा युरोपमध्ये होणार आहे. या दोन्ही आगामी स्पर्धांसाठी भारतीय महिला हॉकी संघासाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा अधिक अनुभवाकरिता आयोजित केला आहे. भारतीय महिला हॉकी संघाला हरेंद्र सिंग हे प्रमुख प्रशिक्षक लाभले आहेत.

भारतीय हॉकी संघामध्ये अनुभवी आणि युवा खेळाडूंचे योग्य समन्वय आहे. पॅरिस ऑलिम्पिकसाठी भारतीय महिला हॉकी संघ पात्र ठरु शकला नाही. महिलांच्या प्रो लीग हॉकी स्पर्धेतील भारतात झालेल्या टप्प्यात भारताने टॉपसिडेड नेदरलँड्सचा पराभव केला.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article