भारत - ऑस्ट्रेलिया टी-20 मालिका आजपासून
वृत्तसंस्था/ कॅनबेरा
कॅनबेरा येथे आज बुधवारी होणाऱ्या पहिल्या टी-20 सामन्यात भारत ऑस्ट्रेलियाविऊद्ध खेळेल तेव्हा सूर्यकुमार यादव त्याच्यातील फलंदाजाने केंद्रस्थानी येऊन चांगले योगदान देण्यास सुऊवात करावी, अशी अपेक्षा बाळगेल. दोन्ही देशांनी त्यांच्या मागील 10 टी-20 सामन्यांपैकी आठ जिंकले आहेत आणि प्रत्येकी एक पराभव झाला आहे. भारताचा एक सामना ‘टाय’ झाला, तर ऑस्ट्रेलियाचा एक सामना पावसामुळे वाया गेला. यामुळे आजचा सामना चुरसपूर्ण होण्याची चिन्हे दिसून येत आहेत.
कर्णधाराचा दीर्घकाळापासूनचा खराब फॉर्म हे चिंतेचे कारण राहिलेले असले, तरी भारतीय टी-20 संघ देशाच्या तीन संघांमधील सर्वोत्तम आहे आणि नवीन खेळाडूंनी लगेच आपल्या भूमिकेशी जुळवून घेतलेले आहे. कर्णधार म्हणून नियुक्त झाल्यापासून सूर्यकुमारची कामगिरी निकालांच्या बाबतीत अभूतपूर्व आहे. आतापर्यंत 29 सामन्यांमध्ये 23 विजयांसह निर्भय क्रिकेटचा एक आविष्कार या संघाने घडविलेला आहे, जिथे प्रत्येक फलंदाज पहिल्या चेंडूपासूनच सर्वतोपरी धडाकेबाज पद्धतीने खेळलेला आहे.
कोणत्याही परिस्थितीत आक्रमकता आणि सूर्याचे स्वत:चे नेतृत्व कौशल्य यांनी उत्तम कामगिरी करण्यात मोलाचा वाटा उचललेला असून त्याच्या जोरावर सर्व द्विपक्षीय मालिका आणि आशिया चषकही त्यांनी जिंकलेला आहे. अर्थात आशिया चषक हा त्यांनी खंडातील पाकिस्तानसह काही दुय्यम दर्जाच्या संघांना नमवून जिंकलेला आहे आणि सदर संघ कौशल्य, गुणवत्ता आणि कामगिरीचा विचार करता भारतापेक्षा बरेच मागे आहेत. ऑस्ट्रेलियातील मालिका ही पुढील वर्षीच्या सुऊवातीला होणाऱ्या टी-20 विश्वचषकाच्या दृष्टीने भारताच्या खऱ्या तयारीची सुऊवात आहे. याअंतर्गत 15 सामने ते खेळणार आहेत.
परंतु असे म्हणता येईल की, या मालिकेच्या निकालाचा मोठा परिणाम होणार नाही. कारण दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंडविऊद्धचे पुढील 10 सामने परिचित परिस्थितीत होतील आणि टी-20 विश्वचषकात त्यांना तशीच परिस्थिती मिळण्याची शक्यता आहे. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी सूर्याचे समर्थन स्पष्टपणे केलेले असून त्यांना वाटते की, त्याच्या कमी धावसंख्येबद्दल काळजी करण्याची गरज नाही. असे असले, तरी कर्णधाराने त्याच्या बॅटला बोलू देण्याची वेळ आली आहे.
2023 मध्ये सूर्याने 18 डावांमध्ये फलंदाजी करताना जवळजवळ 156 च्या स्ट्राईक रेटने 733 धावा केल्या आणि त्यात दोन शतके आणि पाच अर्धशतके होती. 2024 मध्ये त्याने 151 च्या स्ट्राईक रेटने 450 पेक्षा थोड्या कमी धावा केल्या. परंतु 2025 मध्ये भारतीय कर्णधाराने 10 डावांमध्ये प्रति सामना सरासरी 11 धावा या वेगाने फक्त 100 धावा केल्या आहेत. यात दिसून येणारी विसंगती म्हणजे त्याचा स्ट्राईक रेट आहे, जो 105 पेक्षा जास्त आहे. यावरून असे दिसून येते की, त्याला धावांसाठी संघर्ष करावा लागत असला, तरी त्याने त्याचा आक्रमक दृष्टिकोन पूर्णपणे सोडलेला नाही.
‘मला वाटते की, मी खूप मेहनत करत आहे. असे नाही की, मी आधी कठोर मेहनत करत नव्हतो. मायदेशी माझी काही सत्रे चांगली गेलेली आहेत, येथेही 2-3 सत्रे चांगली गेलेली आहेत, तेव्हा मी चांगल्या स्थितीत आहे, असे कर्णधार मनुका ओव्हल येथे मालिकापूर्व पत्रकार परिषदेत म्हणाला. दुसरीकडे, आशिया कपमध्ये देशाचा सर्वोत्तम खेळाडू ठरलेल्या अभिषेक शर्मासारख्या खेळाडूसाठी ऑस्ट्रेलियन खेळपट्ट्यांवरील अतिरिक्त उसळी हाताळणे हे एक नवीन आव्हान असेल आणि म्हणूनच कर्णधाराचे योगदान अधिक महत्त्वाचे बनते.
सूर्याची समस्या म्हणजे त्याचे मर्यादित फटके आणि नेहमीच चेंडूंच्या वेग आणि उसळीचा वापर करून स्क्वेअरच्या मागे खेळण्याचा प्रयत्न करणे ही आहे. मनुका ओव्हल खेळपट्टीवरील उसळी त्याला त्यावर स्वार होण्याची आणि जास्तीत जास्त फायदा घेण्याची संधी देणार असली, तरी जोश हेझलवूडची उपस्थिती आणि ऑफ-स्टंपच्या जवळपास कसोटी शैलीत त्याच्याकडून करण्यात येणारा मारा यामुळे समस्या निर्माण होतील. अभिषेकसारख्या खेळाडूसमोर नवीन प्रश्न निर्माण होऊ शकतात, तर भारतीय कर्णधारासमोर जुन्या प्रश्नांचा संच असेल. त्याचे टीकाकार नेहमीच असे म्हणतात की, त्याने गेल्या काही वर्षांत मोठ्या संघांविऊद्ध सातत्याने धावा केलेल्या नाहीत.
गोलंदाजीच्या बाबतीत, जसप्रीत बुमराहची उपस्थिती आणि वऊण चक्रवर्तीची चाल हे महत्त्वाचे घटक असतील. वऊण, कुलदीप यादव आणि अक्षर पटेल यांची 12 षटके तसेच बुमराह आणि अर्शदीप यांचे ट्रॅव्हिस हेड आणि धोकादायक मिशेल मार्शविऊद्धचे सुऊवातीच्या स्पेल हे खूप महत्त्वाचे असतील. सर्वांच्या नजरा ऑस्ट्रेलियाचा नवीन टी-20 स्टार मिशेल ओवेनवर असतील, जो गेल्या वर्षी पंजाब किंग्जसाठी खेळला होता. अॅडलेडमध्ये नुकत्याच झालेल्या एकदिवसीय सामन्यात ओवेनने भारताविऊद्ध जबरदस्त कामगिरी केली होती. परंतु त्याला फिरकी गोलंदाजीच्या 12 षटकांचा सामना करावा लागण्याची शक्यता असून ते निश्चितच त्याच्या फटकेबाजी कौशल्याची चाचणी घेईल.
संघ : भारत-सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, शुभमन गिल (उपकर्णधार), तिलक वर्मा, नितीशकुमार रे•ाr, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा, वऊण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, हर्षित राणा, संजू सॅमसन, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर.
ऑस्ट्रेलिया: मिशेल मार्श (कर्णधार), शॉन अॅबॉट (सामने 1 ते 3), झेवियर बार्टलेट, महली बियर्डमन (सामने 3 ते 5), टिम डेव्हिड, बेन द्वारशुइस (सामने 4 व 5), नॅथन एलिस, जोश हेझलवूड (सामने 1 व 2), ग्लेन मॅक्सवेल (सामने 3 ते 5), ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, मॅथ्यू कुहनेमन, मिशेल ओवेन, जोश फिलीप, तन्वीर संघा, मॅथ्यू शॉर्ट, मार्कस स्टोइनिस.
सामन्याची वेळ : दुपारी 1.45 वा.