महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

भारत-ऑस्ट्रेलिया ‘बॉक्सिंग डे’ कसोटी आजपासून

06:58 AM Dec 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

रोहित शर्मा सलामीला तर राहुल तिसऱ्या क्रमांकावर खेळणार, शुभमन गिल मधल्या फळीत खेळण्याची शक्यता

Advertisement

वृत्तसंस्था/ मेलबर्न

Advertisement

देवाची कृपा आणि शेपटाने केलेला प्रतिकार यामुळे ब्रिस्बेनमध्ये भारताचा ढासळत चाललेला उत्साह कदाचित किंचित उंचावलेला असला, तरी आज गुरुवारपासून येथे सुरू होणाऱ्या बॉक्सिंग डे कसोटीत पाहुण्यांना गारद करणारी धडक देण्यास ऑस्ट्रेलिया सज्ज झालेला आहे. फॉर्मात नसलेला कर्णधार रोहित शर्माच्या फलंदाजीच्या स्थानावर यावेळी लक्ष राहील.

रोहित या सामन्यात खत्रीशीर सलामीवीर के. एल. राहुलची जागा घेऊ शकतो, असा अंदाज लावला जात आहे. तसे झाल्यास, राहुल तिसऱ्या क्रमांकावर येईल, तर शुभमन गिल एक तर मधल्या फळीत खेळू शकेल किंवा त्याला वगळून ध्रुव जुरेलला संधी देण्यात येईल. मालिका सध्या 1-1 अशी बरोबरीत असल्याने या सामन्याचे महत्त्व वाढले आहे. भारतीय कर्णधाराने 2019 मध्ये सलामीला पाठविण्यात आल्यानंतर मधल्या फळीत फलंदाजी करणे थांबवले होते. परंतु फॉर्मात असलेला राहुल आणि पहिल्या कसोटीतील शतकवीर यशस्वी जैस्वालला सामावून घेण्यासाठी त्याने अॅडलेड आणि ब्रिस्बेनमध्ये खालच्या क्रमांकावर फलंदाजीस येणे पसंत केले. पण ही चाल पूर्णपणे अपयशी ठरली.

रोहित सलामीस आला आणि गिलला वगळले किंवा पाचव्या क्रमांकावर येऊन त्याने फलंदाजी केली, तर संघ या बदलांशी कसा जुळवून घेतो हे पाहावे लागेल. सामन्यापूर्वीच्या पत्रकार परिषदेत रोहितला फलंदाजीच्या स्थानाबद्दल विचारले असता तो काहीसा चिडल्याप्रमाणे झाला. ‘त्याची काळजी करू नका. मला वाटते की, कोणी कुठे फलंदाजी करायची याची चर्चा खेळाडूंमध्येच व्हायला हवी आणि प्रत्येक पत्रकार परिषदेत या प्रश्नाचे उत्तर देत मला बसावे लागू नये’, असे तो म्हणाला.

दिग्गजांची परीक्षा

टीकेचे लक्ष्य बनलेल्या रोहितची कसोटी फलंदाज म्हणून प्रतिष्ठा पणाला लागली आहे, तर कोहलीने त्याच्यातील विजेत्याला जागे करण्याची गरज आहे. याच ठिकाणी त्याने केलेली टी-20 तील खेळी हे त्याच्या कारकिर्दीचे एक वैशिष्ट्या राहिले आहे. पॅट कमिन्स आणि मिचेल स्टार्कने त्याला ऑफ स्टंपच्या बाहेर मारा करतील हे स्पष्ट आहे. पण आता त्याने संयमाने वागण्याचा गरज आहे.  रोहितसमोर कर्णधार या नात्याने पुढील दोन कसोटी जिंकणे आणि जूनमध्ये लॉर्ड्सवर होणाऱ्या कसोटी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात संभाव्य प्रवेश मिळविणे हे समीकरण उभे राहिले आहे.

अतिरिक्त फिरकीपटूला संधी ?

आज तापमान 40 अंशांच्या जवळपास राहण्याचा आणि दुसरा दिवसही तितकाच गरम राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे अतिरिक्त फिरकीपटू वापरण्यावर संघ व्यवस्थापन गांभीर्याने विचार करेल. परंतु एमसीजीवरील अलीकडील कसोटांतील संघांवर नजर टाकल्यास दुसऱ्या फिरकीपटूचा पर्याय व्यवहार्य दिसत नाही. येथील खेळपट्टीवर फारसे तडे नाहीत, परंतु त्यावर चेंडू वेगवेगळ्या पद्धतीने उसळू शकतो. याचा पूर्वी नॅथन लायनने पुरेपूर वापर केलेला आहे. पण फिंगर स्पिनर म्हणून कमी अनुभवी वॉशिंग्टन सुंदरच्या तुलनेत तो जास्त भेदक आहे. शिवाय वॉशिंग्टन सुंदरला संघात सामावून घेणे जमेल का हाही प्रश्न आहे. कारण नितीश रे•ाrला वगळणे ही अत्यंत वाईट चाल ठरू शकते. ते आकाश दीपला वगळून त्याला खेळवतील का हे पाहावे लागले. पण परिस्थिती पाहता ते कठीणच वाटते.

2014 पासून भारत एमसीजीवर अपराजित

अॅडलेडमधील गुलाबी चेंडूच्या कसोटीतील पराभवानंतर गब्बा येथे पावसाचा व्यत्यय आलेला आणि बरोबरीत सुटलेला सामना भारतासाठी दिलासादायक ठरला. पण आता भारत त्यांच्या आवडत्या ऑस्ट्रेलियन ठिकाणी परतला आहे. एमसीजीवर 2014 च्या मालिकेपासून ते कसोटीत अपराजित राहिले आहेत. तीन कसोटींपैकी शेवटच्या दोन (2018-19 आणि 2020-21) सामन्यांतील भारतीय विजयांमध्ये भक्कम फलंदाजीने मोलाची भूमिका बजावली. पण तीन तऊण खेळाडू (यशस्वी जैस्वाल, रिषभ पंत आणि शुभमन गिल), एक आत्मविश्वास वाढलेला सलामीवीर (के. एल. राहुल) आणि काही वाढत्या वयाचे दिग्गज (विराट कोहली आणि रोहित) यांचा समावेश असलेली सध्याची फळी तेवढी भक्कम दिसत नाही.  त्यांना यावेळी यजमानांविरुद्ध सर्वोत्तम प्रदर्शन करावे लागेल.

कोन्स्तासवर नजर, हेड तंदुरुस्त

ऑस्ट्रेलियाकडे दुखापतग्रस्त जोश हेझलवूड नसला, तरी स्थानिक गोलंदाज स्कॉट बोलंड त्याची कसर भरून काढण्याचा प्रयत्न करेल आणि जैस्वाल, गिल व पंत यांना त्यांच्याविषयीच्या अपेक्षांना जागावे लागेल. यजमानांच्या दृष्टीने सर्वांच्या नजरा तरुण सॅम कोन्स्तासवर असतील. भविष्यातील तारा म्हणून या आक्रमक फलंदाजाकडे पाहिले जात असून त्याच्यावर जसप्रीत बुमराहला तोंड देण्याची जबाबदारी राहील. कोन्स्तास हे चांगलेच जाणून आहे की, बुमराहमुळे सलामवीर नॅथन मॅकस्विनीच्या कारकिर्दीला ब्रेक लागला आहे. ऑस्ट्रेलियासाठी दुसरी चांगली बातमी म्हणजे ट्रॅव्हिस हेड पूर्णपणे तंदुऊस्त झाला आहे आणि मेलबर्नवर तो उतरणार आहे. हेडचे बुधवारी भरपूर सराव केला. याअंतर्गत त्याने फिटनेस चाचणी दिली आणि नंतर जाळ्यात सराव करतानाही तो भरपूर चांगला दिसलाव्मालिकेत 89, 140 आणि 152 अशा धावसंख्या नोंदविलेल्या हेडसाठी भारतीय गोलंदाजांना काही विशेष योजना राबवाव्या लागतील.

संघ-भारत : रोहित शर्मा (कर्णधार), के. एल. राहुल, यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, रिषभ पंत, रवींद्र जडेजा, नितीश रे•ाr, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, आकाश दीप, वॉशिंग्टन सुंदर, प्रसिद्ध कृष्णा, हर्षित राणा, तनुष कोटियन, सर्फराज खान, अभिमन्यू ईश्वरन, ध्रुव जुरेल, देवदत्त पडिक्कल.

ऑस्ट्रेलिया : पॅट कमिन्स (कर्णधार), उस्मान ख्वाजा, सॅम कोन्स्तास, मार्कस लाबुशेन, स्टीव्ह स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, अॅलेक्स कॅरी, मिचेल स्टार्क, स्कॉट बोलँड, नॅथन लायन.

सामन्याची वेळ : भारतीय वेळेनुसार पहाटे 5 वा.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article