महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

भारत अ संघाचे दोन प्रथमश्रेणी सामने

06:22 AM May 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ मेलबर्न

Advertisement

भारतीय क्रिकेट संघ या वर्षाच्या अखेरीस ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणार असून या दौऱ्यात उभय संघामध्ये बॉर्डर-गावसकर चषकासाठी कसोटी मालिका होणार आहे. त्याआधी भारत अ संघ ऑस्ट्रेलियात दोन प्रथमश्रेणी सामने ऑस्ट्रेलिया अ विरुद्ध खेळणार आहे.

Advertisement

भारत अ आणि ऑस्ट्रेलिया अ यांच्यातील पहिला प्रथमश्रेणी सामना 31 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर दरम्यान मॅके येथे तर दुसरा सामना 7 ते 10 नोव्हेंबर दरम्यान मेलबर्न येथे होणार आहे. या दोन सरावांच्या सामन्यामुळे उभय देशांच्या नवोदित युवा खेळाडूंना आपल्या दर्जेदार कामगिरीच्या जोरावर कसोटी संघात स्थान मिळविण्याची संधी मिळू शकेल, असे क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या प्रवक्त्याने सांगितले आहे. त्याचप्रमाणे ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणाऱ्या भारतीय क्रिकेटचा संघ वाका मैदानावर 17 नोव्हेंबरपासून तीन दिवसांचा सरावाचा सामना खेळणार आहे. 2020-21 साली ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया अ संघाविरुद्ध एक सराव सामना खेळला होता.

त्याचप्रमाणे भारतीय महिला क्रिकेट संघ याच कालावधीत ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघातील दुसरा वनडे सामना 8 डिसेंबरला होणार आहे. दरम्यान याच कालावधीत पुरुषांची दुसरी कसोटी खेळवली जाणार आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article