For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

इंडिया अ संघाची फलंदाजीत पुन्हा वाताहत

06:39 AM Nov 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
इंडिया अ संघाची फलंदाजीत पुन्हा वाताहत
Advertisement

वृत्तसंस्था / मेलबर्न

Advertisement

येथे सुरू असलेल्या दुसऱ्या अनधिकृत कसोटी सामन्यात शुक्रवारी खेळाच्या दुसऱ्या दिवशी इंडिया अ संघाची दुसऱ्या डावातही फलंदाजीची वाताहत झाली. दिवसअखेर इंडिया अ संघाने दुसऱ्या डावात 5 बाद 73 धावा जमविल्या. के. एल. राहुल पुन्हा लवकर बाद झाला. इंडिया अ संघाने ऑस्ट्रेलिया अ संघावर 11 धावांची नाममात्र आघाडी घेतली असून शनिवारी हा सामना निकाली होण्याची शक्यता आहे.

दोन सामन्यांच्या या कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलिया अ ने पहिली कसोटी जिंकून यापूर्वीच आघाडी घेतली आहे. इंडिया अ संघाच्या फलंदाजीची दुर्दशा पुढेही चालुच राहिली आहे. या दुसऱ्या सामन्यात इंडिया अ चा पहिला डाव 161 धावांत आटोपल्यानंतर ऑस्ट्रेलिया अ संघाने पहिल्या डावात 223 धावा जमवित इंडिया अ संघावर 62 धावांची आघाडी मिळविली. त्यानंतर इंडिया अ संघाने दुसऱ्या डावात 31 षटकात 5 बाद 73 धावा जमविल्या आहेत.

Advertisement

ऑस्ट्रेलिया अ संघाने 2 बाद 53 या धावसंख्येवरुन दुसऱ्या दिवशीच्या खेळाला पुढे प्रारंभ केला. हॅरीसने 138 चेंडूत 5 चौकारांसह 74, जिमी पियरसनने 70 चेंडूत 5 चौकारांसह 30, मॅकअॅन्ड्य्रूने 36 चेंडूत 2 चौकारांसह 26 तर कोरी रॉचीसिओलीने 28 चेंडूत 2 षटकार आणि 3 चौकारांसह 35 धावा जमविल्या. इंडिया अ तर्फे प्रसिद्ध कृष्णाने 50 धावांत 4, मुकेशकुमारने 41 धावांत 3 तर खलिल अहमदने 56 धावांत 2 गडी बाद केले.

62 धावांनी पिछाडीवर असलेल्या इंडिया अ संघाच्या दुसऱ्या डावालाही डळमळीत सुरुवात झाली. ऑस्ट्रेलियाच्या भेदक गोलंदाजीसमोर इंडिया अ चा निम्मा संघ 31 षटकात 73 धावांत तंबूत परतला. सलामीच्या ईश्वरनने 2 चौकारांसह 17, के. एल. राहुलने 10, साई सुदर्शनने 3, कर्णधार ऋतुराज गायकवाडने 1 चौकारासह 11 तर देवदत्त पडिक्कलने 1 धाव जमविली. जुरेल 19 तर नितीशकुमार रे•ाr 9 धावांवर खेळत आहेत. ऑस्ट्रेलिया अ तर्फे मॅकअॅन्ड्य्रू आणि वेबस्टर यांनी प्रत्येकी 2 तर रॉचीसिओलीने 18 धावांत 1 गडी बाद केला. या सामन्यातील दुसरा दिवसही गोलंदाजांनी गाजविला. दिवसभरात एकूण 13 गडी बाद झाले.

संक्षिप्त धावफलक : इंडिया अ प. डाव सर्वबाद 161, ऑस्ट्रेलिया अ प. डाव 62.1 षटकात सर्व बाद 223 (हॅरिस 74, मॅकस्वीनी 14, डेव्हीस 13, पियरसन 30, मॅकअॅन्ड्य्रू नाबाद 26, रॉचीसिओली 35, अवांतर 20, प्रसिद्ध कृष्णा 4-50, मुकेशकुमार 3-41, खलिल अहमद 2-56), इंडिया अ दु. डाव 31 षटकात 5 बाद 73 (ईश्वरन 17, राहुल 10, साई सुदर्शन 3, गायकवाड 11, पडिक्कल 1, जुरेल खेळत आहे 19, नितीशकुमार रे•ाr खेळत आहे 9, मॅकअॅन्ड्य्रू 2-22, वेबस्टर 2-14, रॉचीसिओली 1-18)

Advertisement
Tags :

.