For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारत-द.आफ्रिका महिला टी-20 मालिका

06:25 AM Jul 02, 2024 IST | Tarun Bharat Portal
भारत द आफ्रिका महिला टी 20 मालिका
India-Africa Women's T20 Series
Advertisement

वृत्तसंस्था/जोहान्सबर्ग

Advertisement

दक्षिण आफ्रिकेचा महिला क्रिकेट संघ सध्या भारताच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यामध्ये पहिल्यांदा झालेल्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत भारतीय महिला संघाने द. आफ्रिकेचा 3-0 असा एकतर्फी पराभव केला. त्यानंतर सोमवारी झालेल्या एकमेव कसोटी सामन्यात भारताने द. अफ्रिकेला नमवले. आता उभय संघात तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेला 5 जुलैपासून चेन्नईत प्रारंभ होत आहे. या मालिकेसाठी द. आफ्रिकेचे नेतृत्व लॉरा वूलव्हर्टकडे सोपविण्यात आले आहे.

या मालिकेसाठी घोषित करण्यात आलेल्या द. आफ्रिका संघामध्ये केवळ एकमेव बदल करण्यात आला आहे. वनडे आणि कसोटी सामन्यात गैरहजर राहिलेल्या सी. ट्रायोनचा द. आफ्रिका संघात समावेश करण्यात आला आहे. सोमवारी एकमेव कसोटी सामन्यात भारताने द. आफ्रिकेचा 10 गड्यांनी दणदणीत पराभव केला.  टी-20 मालिकेत द. आफ्रिकेचा संघ चांगली कामगिरी करेल, अशी आशा बाळगली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना 5 जुलैला, दुसरा सामना 7 जुलै आणि तिसरा सामना 9 जुलै रोजी चेन्नईच्या चिदंबरम् स्टेडीमयमवर खेळविला जाणार आहे.

Advertisement

द. आफ्रिका संघ-वूलव्हर्ट (कर्णधार), बॉश्च, ब्रिटस्, डी क्लर्क, डेरेक्सन, डी. रिडेर, जेफ्ता, कॅप, खाका, क्लास, सुने लुस, मार्क्स, मलाबा, सेखुखुने आणि ट्रायॉन.

Advertisement
Tags :

.