महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

भारत अ महिला संघाचा 171 धावांनी विजय

06:37 AM Aug 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ मॅकाय (ऑस्ट्रेलिया)

Advertisement

फिरकी गोलंदाज प्रिया मिश्राची भेदक गोलींदाजी आणि तेजल व राघवी यांच्या शानदार अर्धशतकांच्या जोरावर रविवारी येथे खेळविण्यात आलेल्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील शेवटच्या सामन्यात भारत अ महिला संघाने ऑस्ट्रेलिया अ महिला संघाचा 171 धावांनी दणदणीत पराभव केला. सध्या ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर गेलेल्या भारत अ महिला संघाला यापूर्वी सलग पाच सामने गमवावे लागले.

Advertisement

ऑस्ट्रेलिया अ महिला संघाने तीन सामन्यांची टी-20 मालिका 3-0 अशी एकतर्फी जिंकली. त्यानंतर तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत त्यांनी भारत अ महिला संघाचा 2-1 असा पराभव केला. या मालिकेतील पहिले दोन सामने ऑस्ट्रेलिया अ संघाने सलग जिंकून मालिका हस्तगत केली होती. भारत अ महिला संघाने शेवटचा सामना जिंकून ही मालिका ऑस्ट्रेलिया अ महिला संघाला एकतर्फी जिंकण्यापासून रोखले.

रविवारच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारत अ महिला संघाने 50 षटकात 9 बाद 243 धावा जमविल्या. त्यानंतर ऑस्ट्रेलिया अ संघाचा डाव 22.1 षटकात 72 धावांत आटोपला. भारत अ संघातील फिरकी गोलंदाज प्रिया मिश्राने 14 धावांत 5 तर मिन्नू मनीने 4 धावात 2 गडी बाद केले. भारत अ संघाच्या डावामध्ये मध्य फळीतील फलंदाज तेजल हसबनीसने 66 चेंडूत 50 तर राघवी बिस्तने 64 चेंडूत 53 धावा जमविल्या. सजीवन सजनाने 40 तर मिन्नू मनीने 34 धावा केल्या. ऑस्ट्रेलिया अ तर्फे ब्राऊनने 39 धावांत 3 तर नॉटने 26 धावांत 2 गडी बाद केले. ऑस्ट्रेलिया अ संघाच्या डावामध्ये सलामीच्या मॅडी डार्कने 22 तर फ्लिन्टॉफने 20 धावा केल्या. 15 व्या षटकाअखेर ऑस्ट्रेलिया अ संघाची स्थिती 4 बाद 52 अशी होती. त्यानंतर प्रियाने फेलटूमला 2 धावावर, पिटर्सनला एका धावेवर तसेच हेनकॉकला खाते उघडण्यापूर्वी बाद केले. आता उभय संघातील एकमेव अनधिकृत कसोटी सामना 22 ऑगस्टपासून गोल्डकोस्ट येथे खेळविला जाईल.

संक्षिप्त धावफलक - भारत अ 50 षटकात 9 बाद 243 (तेजल हसबनीस 50, राघवी बिस्त 53, सजना 40, मिन्नू मनी 34, ब्राऊन 3-39, नॉट 2-26), ऑस्ट्रेलिया अ 22.1 षटकात सर्व बाद 72 (डार्क 22, फ्लिन्टॉफ 20, प्रिया मिश्रा 5-14, मिन्नू मनी 2-4).

Advertisement
Tags :
##tarunbharat#social media
Next Article