For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पहिल्या वनडेत भारत अ महिला संघ पराभूत

06:10 AM Aug 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
पहिल्या वनडेत भारत अ महिला संघ पराभूत
Advertisement

वृत्तसंस्था/ मकाय, ऑस्ट्रेलिया

Advertisement

मध्यफळतील फलंदाज राघवी बिश्त व तेजल हसबनिस यांनी शानदार अर्धशतके झळवल्यानंतरही भारत अ महिला संघाला पहिल्या वनडे सामन्यात ऑस्ट्रेलिया अ महिला संघाकडून 4 गड्यांनी पराभव स्वीकारावा लागला. ऑस्ट्रेलियाच्या केटी मॅकने शानदार शतक नोंदवले.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असणाऱ्या भारत अ महिला संघाचा हा दौऱ्यातील सलग चौथा पराभव आहे. याआधी तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत ऑस्ट्रेलिया अ संघाने त्यांना 3-0 असे एकतर्फी पराभूत केले आहे. तेजल (67 चेंडूत 7 चौकारांसह 53) व राघवी (102 चेंडूत 6 चौकारांसह 82) यांच्या अर्धशतकांमुळे भारताने ऑस्ट्रेलियाला 250 धावांचे लक्ष्य दिले होते. पण केटी मॅकने (126 चेंडूत 129) नोंदवलेल्या शतकामुळे ऑस्ट्रेलिया अ संघाने 4 गडी राखून विजय साकार केला. केटीने सलामीवीर मॅडी डार्क (27) व चार्ली नॉट (26) यांच्यासह अर्धशतकी तर कर्णधार ताहलिया मॅकग्रासमवेत शतकी भागीदारी नोंदवली. मॅकग्राने 56 धावांचे योगदान दिले. भारताच्या मेघना सिंगने 43 धावांत 2, स्पिनर मिन्नू मनीने 53 धावांत 2 बळी मिळविले.

Advertisement

3 बाद 56 अशा स्थितीनंतर वनडे पदार्पण करणाऱ्या तेजल व राघवी यांनी 55 धावांची भागीदारी करीत भारत अ संघाचा डाव सावरला. राघवीने नंतर कर्णधार मनी व क्षिप्रा गिरी (नाबाद 25) यांच्यासमवेत अर्धशतकी भागीदारी करीत आपल्या संघाला अडीचशेची मजल मारून दिली.

संक्षिप्त धावफलक : भारत अ महिला 50 षटकांत 9 बाद 249 : तेजल हसबनिस 53, राघवी बिश्त 82, निकोला हॅनकॉक 2-40, ब्राऊन 4-23, ग्रेस पार्सन्स 2-40. ऑस्ट्रेलिया अ महिला 47 षटकांत 6 बाद 250 : केटी मॅक 129, मॅकग्रा 56, मेघना सिंग 2-43, मिन्नू मनी 2-53.

Advertisement
Tags :

.