महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

भारत अ महिला संघ पराभवाच्या छायेत

06:12 AM Aug 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था / गोल्डकोस्ट

Advertisement

सध्या ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर असलेला भारत अ महिला क्रिकेट संघ येथे एकमेव अनाधिकृत कसोटी सामन्यात पराभवाच्या छायेत वावरत आहे. भारत अ महिला संघाला विजयासाठी 290 धावांचे आव्हान ऑस्ट्रेलिया अ संघाने दिले. पण भारत अ महिला संघाची दुसऱ्या डावात स्थिती 68 षटकात 6 बाद 149 अशी केविलवाणी झाली आहे.

Advertisement

या सामन्यात ऑस्ट्रेलिया अ महिला संघाने पहिल्या डावात 212 धावा जमविल्यानंतर भारत अ महिला संघाचा पहिला डाव 184 धावांत आटोपला. ऑस्ट्रेलिया अ महिला संघाने 28 धावांची आघाडी मिळविली. त्यानंतर ऑस्ट्रेलिया अ महिला संघाने दुसऱ्या डावात 260 धावा जमवित भारत अ संघाला निर्णायक विजयासाठी 289 धावांचे कठीण आव्हान दिले. भारत अ महिला संघाच्या दुसऱ्या डावात श्वेता शेरावतने 3 चौकारांसह 21, प्रिया पुनियाने 7 चौकारांसह 36, शुभा सतीशने 3 चौकारांसह 45 धावा जमविल्या. राघवी बिस्त 16 तर उमा छेत्री 10 धावांवर खेळत आहे. भारतीय संघाला विजयासाठी आणखी 140 धावांची गरज असून त्यांचे 4 गडी खेळावयाचे आहेत. या सामन्यातील खेळाचा एक दिवस बाकी असल्याने ऑस्ट्रेलिया अ महिला संघ विजयादिशेने वाटचाल करीत आहे.

संक्षिप्त धावफलक ऑस्ट्रेलिया अ प. डाव 212, भारत अ प. डाव 184, ऑस्ट्रेलिया अ दु. डाव 260, भारत अ दु. डाव 6 बाद 149.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article