कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

भारत अ महिला क्रिकेट संघ पराभूत

06:00 AM Aug 08, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/मॅके (ऑस्ट्रेलिया)

Advertisement

भारत अ महिला क्रिकेट संघ सध्या ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर असून उभय संघामध्ये टी-20 मालिका खेळविली जात आहे. या मालिकेतील गुरुवारी झालेल्या पहिल्याच सामन्यात ऑस्ट्रेलिया अ महिला संघाने भारत अ संघाचा 13 धावांनी पराभव करत विजयी सलामी दिली. या सामन्यात प्रेमा रावतची कामगिरी वाया गेली.

Advertisement

ऑस्ट्रेलिया अ आणि भारत अ महिला संघामध्ये ही टी-20 मालिका खेळविली जात आहे. गुरुवारच्या पहिल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलिया अ महिला संघाने 20 षटकात 6 बाद 137 धावा जमविल्या. त्यानंतर भारत अ महिला संघाने 20 षटकात 5 बाद 124 धावांपर्यंत मजल मारल्याने हा सामना गमवावा लागला. या सामन्यात भारत अ संघातील फिरकी गोलंदाज प्रेमा रावतने 15 धावांत 3 गडी बाद केले पण तिची कामगिरी निष्फळ ठरली. भारत अ महिला क्रिकेट संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यात तीन सामन्यांची टी-20 मालिका, तीन सामन्यांची वनडे मालिका आणि एकमेव अनधिकृत कसोटी खेळणार आहे.

ऑस्ट्रेलिया अ संघाच्या डावामध्ये सलामीच्या अॅलिसा हिलीने 27 धावा जमविल्या. भारत अ संघातील फिरकी गोलंदाज सजीवन सजनाने हिलीला ठाकुरकरवी झेलबाद केले. ऑस्ट्रेलिया अ संघातील अनिका लिरॉईडने 44 चेंडूत नाबाद 50 धावांची खेळी करताना सात चौकार ठोकले. एका बाजुने फलंदाज बाद होत असताना लिरॉईडने आपल्या संघाचा डाव सावरत नाबाद अर्धशतक झळकविले. भारत अ संघातील प्रेमा रावतने सलामीची ताहीला विल्सनला 17 धावांवर तसेच कोर्टनी वेबला 11 धावांवर आणि कर्णधार निकोली फेलटूमला 11 धावांवर बाद केले. प्रेमाने आपल्या चार षटकात 14 धावांत 3 गडी बाद केले.

प्रत्युत्तरादाखल खेळताना भारत अ संघाच्या डावाला डळमळीत सुरूवात झाली. सलामीची शेफाली वर्मा केवळ 3 धावांवर बाद झाली. इंग्लंड विरुद्ध झालेल्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत शेफाली वर्माने दर्जेदार कामगिरी केली होती. मात्र ऑस्ट्रेलिया अ संघातील वेगवान गोलंदाजांसमोर भारतीय फलंदाजांना धावा घेणे कठीण केले. उमा छेत्रीने 31 तर अष्टपैलु राघवी बिस्तने 33 धावा जमविल्याने भारत अ महिला संघाला या सामन्यात 100 धावांचा टप्पा ओलांडता आला. कर्णधार राधा यादवने 22 चेंडूत नाबाद 26 धावा केल्या.

संक्षिप्त धावफलक

ऑस्ट्रेलिया अ - 20 षटकात 6 बाद 137 (अॅलिसा हिली 27, अनिका लिरॉइड 50, ताहिला विल्सन 17, वेब 11, फेलटुम 11, प्रेमा रावत 3-15), भारत अ 20 षटकात 5 बाद 124 (उमा छेत्री 31, राघवी बिस्त 33, राधा यादव नाबाद 26, अॅमी एडगर 2-23, जिंजीर 2-26)

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article