भारत ‘अ’-दक्षिण आफ्रिका ‘अ’ सामना आजपासून
वृत्तसंस्था/ बेंगळूर
तीन महिन्यांच्या दुखापतींनंतर रिषभ पंतचे स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये पुनरागमन हा आज गुऊवारपासून येथे सुरू होणाऱ्या भारत ’अ’च्या दक्षिण आफ्रिका ’अ’विऊद्धच्या चार दिवसांच्या सामन्याचा मुख्य केंद्रबिंदू असेल.
23 जुलै रोजी इंग्लंडविऊद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यादरम्यान पंतला पायाची दुखापत झाली होती आणि तेव्हापासून तो सावरण्याच्या मार्गावर आहे. पंत या काळात वेस्ट इंडिजविऊद्धच्या घरच्या कसोटी मालिकेला मुकला. परंतु बीसीसीआय सीओई मैदानावर होणारे हे दोन चार दिवसांचे सामने, ज्यामध्ये तो भारत ‘अ’ संघाचे नेतृत्व करणार आहे, त्याला विश्वविजेत्या दक्षिण आफ्रिकेविऊद्धच्या घरच्या कसोटी मालिकेपूर्वी आलेली सुस्ती घालविण्याची उत्तम संधी देईल. हा 28 वर्षीय खेळाडू विंडीजविऊद्ध उत्कृष्ट कामगिरी केलेल्या ध्रुव जुरेलची जागा दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत यष्टीरक्षक फलंदाज म्हणून घेऊ शकतो.
सीओईमध्ये सराव करत असलेला पंत या भागात सतत कोसळणाऱ्या पावसाने खेळ खराब न केल्यास मैदानावर दर्जेदार वेळ घालवण्यास उत्सुक असेल. ऑफस्पिनर प्रेनेलन सुब्रायन वगळता कमी अनुभवी दक्षिण आफ्रिका ’अ’चा गोलंदाजी विभाग पंतसमोर फारसे कठीण आव्हान उभे करू शकणार नाही. फलंदाजीला धारदार करण्याव्यतिरिक्त पंत आपल्या यष्टीरक्षणाच्या कौशल्यावर देखील भर देईल. कारण कसोटी मालिकेत रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादवसारख्या उच्च दर्जाच्या गोलंदाजांना त्याला हाताळावे लागेल. त्यादृष्टीने सरांश जैन, मानव सुतार आणि हर्ष दुबे यांचा समावेश असलेला भारत ’अ’च्या फिरकी गोलंदाजांचा सक्षम संच त्याला सरावाची चांगली संधी देईल.
साई सुदर्शनचा शेवटचा सामना या महिन्याच्या सुऊवातीला दिल्लीत झालेला वेस्ट इंडिजविऊद्धचा दुसरा कसोटी सामना होता आणि हे दोन ’अ’ सामने त्याला दक्षिण आफ्रिका मालिकेपूर्वी मौल्यवान सराव देतीलृ सध्या तरी तामिळनाडूच्या या फलंदाजाने तिस्रया क्रमांकावर स्थान मिळवले आहे असे दिसते. पण लवकरच मोठी धावसंख्या उभारण्याची त्याची नक्कीच इच्छा असेल. या 24 वर्षीय खेळाडूने त्याच्या प्रतिभेची झलक दाखवलेली असली, तरी नऊ डावांमध्ये त्याच्याकडे फक्त दोन अर्धशतके आहेत आणि हा डावखुरा फलंदाज दक्षिण आफ्रिका ’अ’विऊद्धच्या सामन्यांचा वापर त्याच्या खेळाला आणखी चमक देण्यासाठी करण्यास उत्सुक असेल. या दोन खेळाडूंव्यतिरिक्त भारत ’अ’ संघात खलील अहमद, अंशुल कंबोज, देवदत्त पडिक्कल, नारायण जगदीशन इत्यादी खेळाडूंचा समावेश आहे.