कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

भारत अ ला 166 धावांची जरुरी

06:23 AM Nov 02, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

   वृत्तसंस्था / बेंगळूर

Advertisement

येथे सुरू असलेल्या चार दिवसांच्या पहिल्या अनाधिकृत कसोटी सामन्यात शनिवारी खेळाच्या तिसऱ्या दिवसाअखेर भारत अ संघाला निर्णायक विजयासाठी 166 धावांची जरुरी असून त्यांनी दिवसअखेर दुसऱ्या डावात 4 बाद 119 धावा जमविल्या. कर्णधार ऋषभ पंतला फलंदाजीचा सूर मिळाल्याचे दिसत असून तो 64 धावांवर खेळत आहे.

Advertisement

या सामन्यात द.आफ्रिका अ संघाचा पहिला डाव 309 धावांवर आटोपल्यानंतर भारत अ संघाने पहिल्या डावात 234 धावा जमविल्या. द. आफ्रिका अ संघाने पहिल्या डावात 75 धावांची आघाडी घेतली. त्यानंतर द.आफ्रिका अ संघाने बिनबाद 30 या धावसंख्येवरुन तिसऱ्या दिवशीच्या खेळाला पुढे प्रारंभ केला आणि त्यांचा दुसरा डाव 199 धावांत आटोपला. भारत अ संघाला निर्णायक विजयासाठी 275 धावांचे आव्हान मिळाले. द. आफ्रिका अ संघाच्या दुसऱ्या डावात हमझा आणि सिनोकवेणी यांनी प्रत्येकी 37 तर मोर्कीने 25 धावा जमविल्या. भारत अ संघातील तनुष कोटियानने 26 धावांत 4, कंबोजने 39 धावांत 3, ब्रारने 2 व मानव सुतारने 1 गडी बाद केला.

भारत अ संघाच्या दुसऱ्या डावाला प्रारंभ झाल्यानंतर मोर्कीच्या भेदक गोलंदाजीसमोर भारत अ संघाचे पहिले दोन फलंदाज केवळ 19 धावांत बाद झाले. आयुष म्हात्रे मोर्कीच्या गोलंदाजीवर 6 धावांवर त्रिफळाचीत झाला. मोर्कीने साई सुदर्शनला 12 धावांवर पायचीत केले. सिलेने देवदत्त पडीकलचा 5 धावांवर त्रिफळा उडविला. भारत अ संघाची स्थिती यावेळी 3 बाद 32 अशी केविलवाणी होती. कर्णधार ऋषभ पंत आणि रजत पाटीदार यांनी चौथ्या गड्यासाठी 87 धावांची भागिदारी केली. पाटीदारने 5 चौकारांसह 28 धावा जमविल्या. ऋषभ पंत 2 षटकार आणि 8 चौकारांसह 64 धावांवर खेळत आहे. द. आफ्रिका अ संघातर्फे मोर्कीने 2 तर सिली आणि व्युरेन यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.

संक्षिप्त धावफलक: द. आफ्रिका अ प. डाव 309, भारत अ प. डाव 234, द. आफ्रिका अ दु. डाव सर्वबाद 199 (सेनोवेनी 37, हमझा 37, मोर्की 25, कोटियान 4-26, कंबोज 3-39, ब्रार 2-40, सुतार 1-49), भारत अ दु. डाव 39 षटकात 4 बाद 119 (ऋषभ पंत खेळत आहे 64, पाटीदार 28, साई सुदर्शन 12, पडीकल 5, म्हात्रे 6, मोर्की 2-12, सिली व व्युरेन प्रत्येकी 1 बळी).

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article