महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

ऑस्ट्रेलिया अ कडून भारत अ पराभूत

06:15 AM Nov 04, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पहिली अनधिकृत कसोटी : 7 गड्यांनी यजमान संघ विजयी, मॅकस्वीनी, वेबस्टरची नाबाद अर्धशतके

Advertisement

वृत्तसंस्था/ मॅके, ऑस्ट्रेलिया

Advertisement

कर्णधार नाथन मॅकस्वीनी व बो वेबस्टर यांनी नोंदवलेल्या शानदार अर्धशतकांच्या बळावर यजमान ऑस्ट्रेलिया अ संघाने भारत अ ने दिलेले 225 धावांचे आव्हान 7 गड्यांच्या मोबदल्यात पार करीत दोन सामन्यांच्या अनधिकृत कसोटी मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.

या सामन्यात ऑस्ट्रेलिया अ कडून फलंदाजी मिळाल्यावर भारत अ चा डाव 107 धावांत आटोपला. देवदत्त पडिक्कल (36) व साई सुदर्शन (21), नवदीप सैनी (23) यांनी भारतासाठी दुहेरी धावसंख्या गाठली. सैनीच्या खेळीमुळेच भारत अ ला 9 बाद 86 वरून शतकी मजल मारता आली. ब्रेन्डन डॉगेट सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने 15 धावांत 6 बळी टिपले. जॉर्डन बकिंगहमने 2 व टॉड मर्फी व फर्गस ओनील यांनी एकेक बळी मिळविले. त्यानंतर ऑस्ट्रेलिया अ ने पहिल्या डावात 195 धावा जमवित भारत अ वर 88 धावांची आघाडी घेतली. मॅकस्वीनीने 39, बॉ वेबस्टरने 33, कूपर कोनोलीने 37 धावा जमविल्या. भारत अ च्या मुकेश कुमारने 46 धावांत 6 तर प्रसिद्ध कृष्णाने 43 धावांन 3 बळी मिळविले.

दुसऱ्या डावात भारत अ ची स्थिती 2 बाद 30 धावा जमविल्या असताना साई सुदर्शन (103), देवदत्त पडिक्कल (88) यांनी द्विशतकी भागीदारी करून भारताला मोठी आघाडी मिळवून देण्यास मदत केली. इशान किशननेही 58 चेंडूत 32 धावा जमविल्यानंतर भारत अ चा दुसरा डाव 312 धावांत संपुष्टात आल्याने ऑस्ट्रेलिया अ ला विजयासाठी 225 धावांचे आव्हान मिळाले. दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलिया अ फलंदाजांना भारतीय गोलंदाजांनी बराच त्रास दिल्याने त्यांची स्थिती 3 बाद 85 अशी झाली होती. पण मॅकस्वीनी (नाबाद 88) व वेबस्टर (नाबाद 61) यांनी अभेद्य शतकी भागीदारी करून आपल्या संघाला 7 गड्यांनी विजय मिळवून दिला. या मालिकेतील दुसरा सामना गुरुवारपासून मेलबर्नमध्ये होणार आहे.

संक्षिप्त धावफलक : भारत अ प.डाव 107, दु.डाव सर्व बाद 312 (साई सुदर्शन 103, पडिक्कल 88, इशान किशन 32, अवांतर 25, ओनील 4-55, मर्फी 3-77), ऑस्ट्रेलिया अ प.डाव 195, दु.डाव 3 बाद 75 षटकांत 3 बाद 226 (मार्कस हॅरिस 36, मॅकस्वीनी नाबाद 88, वेबस्टर नाबाद 61, मुकेश कुमार 1-51, प्रसिद्ध कृष्णा 1-27, मानव सुतार 1-53.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article