भारत ‘अ’ची ऑस्ट्रेलिया ‘अ’ वर 120 धावांची आघाडी
मुकेश कुमारचे 46 धावांत 6 बळी, साई सुदर्शन, देवदत्त पडिक्कलची झंझावाती अर्धशतके
वृत्तसंस्था/ मॅके (ऑस्ट्रेलिया)
उदयोन्मुख युवा खेळाडू साई सुदर्शन आणि देवदत्त पडिक्कल यांनी झंझावाती अर्धशतके झळकावल्यानंतर मुकेश कुमारच्या सहा बळींच्या जोरावर भारत ‘अ’ संघाने त्यांच्या पहिल्या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी शुक्रवारी ऑस्ट्रेलिया ‘अ’ संघावर 120 धावांची आघाडी घेतली.
मुकेशची कामगिरी हे दिवसाचे वैशिष्ट्या राहून त्याने 46 धावांत मिळविलेल्या 6 बळींमुळे ऑस्ट्रेलिया ‘अ’ला त्यांच्या पहिल्या डावात 195 वर रोखणे भारत ‘अ’ला शक्य झाले. असे असले, तरी बंगालच्या या वेगवान गोलंदाजाच्या प्रयत्नांनंतरही यजमानांनी पहिल्या डावात 88 धावांची महत्त्वपूर्ण आघाडी मिळवली. पाहुण्यांनी त्यांच्या पहिल्या डावात 107 धावा केल्या होत्या.
मात्र भारत ‘अ’ संघाची दुसऱ्या डावात पुन्हा एकदा निराशाजनक सुऊवात होऊन कर्णधार ऋतुराज गायकवाड (5) आणि सहकारी सलामीवीर अभिमन्यू ईश्वरन (12) हे स्वस्तात बाद झाल्याने 8.5 षटकांत 2 बाद 30 अशी त्यांची अवस्था झाली आहे. पहिल्या डावात खातेही न उघडता बाद झालेल्या गायकवाडने यावेळी फर्गस ओ’नीलच्या गोलंदाजीवर दुसऱ्या स्लिपमध्ये कॅमेरॉन बॅनक्रॉफ्टकडे झेल दिला. ईश्वरनही पुन्हा एकदा चमक दाखवता न येऊन धावबाद झाला.
पण त्यानंतर सुदर्शन आणि पडिक्कल यांनी तिसऱ्या गड्यासाठी 178 धावांची नाबाद भागीदारी करून भारताला नियंत्रण मिळवून दिले. सुदर्शनने 185 चेंडूंत नाबाद 96 धावा करताना नऊ चौकार लगावले, तर पडिक्कलने 167 चेंडूंत पाच चौकारांसह नाबाद 80 धावा केल्या. त्यांना संघाला 200 च्या पुढे नेले. भारत ‘अ’ संघाकडे आता एकूण 120 धावांची आघाडी असून चार दिवसांच्या सामन्यात आणखी दोन दिवस शिल्लक आहेत. दुसरी आणि शेवटची अनधिकृत कसोटी 7 नोव्हेंबरपासून मेलबर्नमध्ये होणार आहे.
त्यापूर्वी 4 बाद 99 वरून सुऊवात केल्यानंतर फलंदाज नॅथन मॅकस्विनी (39) आणि कूपर कॉनोली (37) यांनी पाचव्या यष्टीसाठी 51 धावा जोडल्या. मात्र, सलामीच्या दिवशी दोन बळी घेतलेल्या मुकेशने कॉनोलीला बाद करून ही भागीदारी खंडित केली. जोश फिलीप हा मुकेशचा चौथा बळी ठरला, तर नितीशकुमार रे•ाrने कर्णधार मॅकस्विनीला बाद केल्याने ऑस्ट्रेलिया ‘अ’ संघाची 47.4 षटकांत 136/7 अशी मजल मारता आली. टॉड मर्फी (33) आणि ओ’नील (13) यांच्यातील आठव्या यष्टीसाठीची 41 धावांची भागीदारी प्रसिद्ध कृष्णाने ओ’नीलचा बळी फिळवून संपुष्टात आणली. मुकेशने नंतर ब्रेंडन डॉगेट आणि टॉड मर्फीला बाद करून ऑस्ट्रेलिया ‘अ’ संघाचा डाव गुंडाळला.
संक्षिप्त धावफलक-भारत ‘अ’ पहिला डाव 107, दुसरा डाव 64 षटकांत 2 बाद 208 (साई सुदर्शन नाबाद 96, देवदत्त पडिक्कल नाबाद 80), ऑस्ट्रेलिया ‘अ’ 62.4 षटकांत 195 (नॅथन मॅकस्विनी 39 धावा, मुकेश कुमार 6-46, प्रसिद्ध कृष्णा 3-59).