कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

भारत अ उपांत्य फेरीत

06:00 AM Nov 20, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/दोहा, कतार

Advertisement

हर्ष दुबेने नोंदवलेल्या आक्रमक अधशतकाच्या बळावर भारत अ संघाने येथे सुरू असलेल्या रायझिंग स्टार्स आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत ओमानवर 6 गड्यांनी सहज विजय मिळवित उपांत्य फेरीत स्थान मिळविले,. आधीच्या सामन्यात पाक अ संघाकडून पराभव झाल्यानंतर भारत अ संघाला आगेकूच करण्यासाठी या सामन्यात विजय मिळविणे आवश्यक होते. भारताने शानदार गोलंदाजी करीत ओमानला 20 षटकांत 7 बाद 135 धावांवर रोखले. त्यानंतर जितेश शर्माच्या नेतृत्वाखालील भारत अ संघाने 17.5 षटकांत विजयाचे उद्दिष्ट 6 गड्यांच्या मोबदल्यात गाठले. 14 धावांवर वैभव सूर्यवंशीला जीवदान मिळाले होते. पण त्याचा त्याला फायदा घेता आला नाही.

Advertisement

त्याने 13 चेंडूत 12 धावा केल्या. त्याचा सलामीचा सहकारी प्रियांश आर्यही 6 चेंडूत 10 धावा करून बाद झाला. नमन धीरने (19 चेंडूत 23) काही धाडसी फटके मारल्यानंतर दुबे (44 चेंडूत 53 धावा) व नेहल वढेरा (24 चेंडूत 23) धावा जमवित विजयाचे सोपस्कार पूर्ण केले. चौथ्या क्रमांकावर बढती मिळालेल्या हर्ष दुबेने टी-20 मधील पहिले अर्धशतक नोंदवले. उपांत्य फेरीत भारताचा सामना गट अ मधील अव्वल संघांविरुद्ध होईल तर पाकचा उपांत्य सामनाही त्याच दिवशी होईल. 23 नोव्हेंबर रोजी अंतिम सामना होईल आणि भारत-पाक यांच्यात ही लढत होण्याची शक्यता आहे.

संक्षिप्त धावफलक

ओमान अ 20 षटकांत 7 बाद 135 (वासिम अली नाबाद 54, गुर्जनप्रीत सिंग 2-37, सुयश शर्मा 2-37), भारत अ 17.5 षटकांत 4 बाद 138 (हर्ष दुबे नाबाद 53).

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article