For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

222 धावांच्या आघाडीसह इंडिया अ सुस्थितीत

06:31 AM Sep 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
222 धावांच्या आघाडीसह इंडिया अ सुस्थितीत
Advertisement

मयांक अगरवाल, प्रतम सिंग यांची अर्धशतके

Advertisement

वृत्तसंस्था / अनंतपूर

2024 च्या क्रिकेट हंगामातील येथे सुरू झालेल्या दुलिप करंडक क्रिकेट स्पर्धेतील सामन्यात शुक्रवारी खेळाच्या दुसऱ्या दिवसाअखेर इंडिया अ ने आपली स्थिती अधिक मजबुत करताना इंडिया ड संघावर 222 धावांची भक्कम आघाडी घेतली. कर्णधार मयांक अगरवाल आणि प्रतम सिंग यांनी इंडिया अ तर्फे तर देवदत्त पडिकलने इंडिया ड तर्फे अर्धशतके झळकविली.

Advertisement

या सामन्यात इंडिया अ संघाने पहिल्या डावात 290 धावा जमविल्या होत्या. त्यानंतर इंडिया ड संघाचा पहिला डाव 52.1 षटकात 183 धावांत आटोपला. इंडिया ड संघातील देवदत्त पडिकलने चिवट फलंदाजी करत 92 धावांची खेळी केल्याने त्यांना 183 धावांपर्यंत मजल मारता आली. देवदत्त पडिकलने 124 चेंडूत 15 चौकारांसह 92 धावा जमविल्या. त्याचे शतक 8 धावांनी हुकले. चालु वर्षाच्या प्रारंभी कर्नाटकाच्या देवदत्त पडिकलने इंग्लंड विरुद्ध आपले कसोटी पदार्पण केले होते. प्रसिद्ध प़ृष्णाच्या गोलंदाजीवर पडिकल यष्टीरक्षक कुशाग्रकरवी झेलबाद झाला. इंडिया ड संघाच्या डावात हर्षित राणाने 31 धावा केल्या. इंडिया अ संघातर्फे खलील अहम्मद आणि अकिब खान यांनी प्रत्येकी 3 गडी बाद केले. इंडिया अ संघाने पहिल्या डावात इंडिया ड संघावर 107 धावांची आघाडी मिळविली.

या सामन्यातील शुक्रवारी खेळाच्या दुसऱ्या दिवसाअखेर इंडिया अ ने दुसऱ्या डावात 28.1 षटकात 1 बाद 115 धावा जमविल्या. कर्णधार अगरवालने 87 चेंडूत 8 चौकारांसह 56 धावा जमविल्या. प्रतम सिंगने 82 चेंडूत 6 चौकारांसह नाबाद 59 धावा जमविल्या. तत्पूर्वी इंडिया ड च्या पहिल्या डावात देवदत्त पडिकलने 124 चेंडूत 15 चौकारांसह 92 धावा जमविल्या. हर्षित राणाने 29 चेंडूत 2 षटकारांसह 31 धावा जमविल्या. इंडिया अ संघाने 8 बाद 288 या धावसंख्येवरुन शुक्रवारी खेळाला पुढे प्रारंभ केला आणि त्यांचे शेवटचे दोन गडी केवळ दोन धावांची भर घालत तंबुत परतले.

संक्षिप्त धावफलक: इंडिया अ प. डाव सर्वबाद 290, इंडिया ड प. डाव 52.1 षटकात सर्व बाद 183 (पडिकल 92, हर्षित राणा 31, खलिल अहम्मद 3-39, अकिब खान 3-41), इंडिया अ दु. डाव (28.1 षटकात 1 बाद 115, मयांक अगरवाल 56, प्रतम सिंग खेळत आहे 59)

Advertisement
Tags :

.