महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

इंडिया अ दुलीप करंडकाचा मानकरी

06:30 AM Sep 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ अनंतपूर

Advertisement

कोटीयान आणि प्रसिद्ध कृष्णा यांच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर रविवारी येथे झालेल्या दुलीप करंडक क्रिकेट स्पर्धेच्या सामन्यात इंडिया अ ने इंडिया क चा 132 धावांनी दणदणीत पराभव केला. साई सुदर्शनचे शतक मात्र वाया गेले.

Advertisement

या सामन्यापूर्वी इंडिया अ ने 2 सामन्यातून 6 गुणांसह अंतिम फेरीत प्रवेश मिळविला होता. तर या स्पर्धेच्या गुणतक्त्यात इंडिया क 9 गुणांसह पहिल्या स्थानावर तसेच इंडिया अ 6 गुणांसह दुसऱ्या स्थानावर होता. मात्र रविवारी मिळविलेल्या विजयामुळे इंडिया अ ने स्पर्धेच्या गुणतक्त्यात 3 सामन्यातून 12 गुणांसह आघाडीचे स्थान मिळवित हा संघ दुलीप करंडकाचा मानकरी ठरला.

या सामन्यात इंडिया क संघाला विजयासाठी शेवटच्या दिवशी 350 धावांचे उद्दिष्ट मिळाले होते. पण इंडिया क चा डाव 81.5 षटकात 217 धावांत आटोपला. इंडिया अ संघातील तनुश कोटीयानने 47 धावांत 3 तर प्रसिद्ध कृष्णाने 50 धावांत 3 गडी बाद केले. या सामन्यात प्रसिद्ध कृष्णाने इंडिया क चा शेवटचा फलंदाज बाद केला. इंडिया क ने रविवारी चहापानावेळी 3 बाद 169 धावांपर्यंत मजल मारली होती. साई सुदर्शन आणि ईशान किसन हे चिवट फलंदाजी करत होते. शेवटच्या सत्रामध्ये इंडिया क ला विजयासाठी 30 षटकात 182 धावांची गरज होती. पण कोटीयानने ईशान किसनला 17 धावांवर तर त्यानंतर अभिषेक पोरलला खाते उघडण्यापूर्वी आणि नारंगला 6 धावांवर बाद केल्याने इंडिया क चे आव्हान संपुष्टात आले. इंडिया अ ने आपला दुसरा डाव 6 बाद 286 धावांवर घोषित केला. इंडिया क च्या दुसऱ्या डावात ऋतुराज गायकवाडने 44 तर साई सुदर्शनने 206 चेंडूत 12 चौकारांसह 111 धावांची खेळी केली पण ती वाया गेली.

संक्षिप्त धावफलक - इंडिया अ प. डाव 297, इंडिया क प. डाव 234, इंडिया अ दु. डाव 6 बाद 286 डाव घोषित (रियान पराग 73, शाश्वत रावत 53, गौरव यादव 4-68), इंडिया क दु डाव 81.5 षटकात सर्वबाद 217 (साई सुदर्शन 111, गायकवाड 44, प्रसिद्ध कृष्णा 3-50, कोटीयान 3-47, अकिब खान 2-26).

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article