For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

लिंगराज संघाकडे स्वातंत्र्य चषक

10:44 AM Aug 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
लिंगराज संघाकडे स्वातंत्र्य चषक
Advertisement

पदवीपूर्व महाविद्यालयीन फुटबॉल स्पर्धा : सेंट जोसेफ धारवाडचा केला पराभव

Advertisement

बेळगाव : धारवाड येथील विद्यागिरी फुटबॉल क्लब आयोजित 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त आंतर महाविद्यालयीन फुटबॉल चषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत लिंगराज पदवीपूर्व महगाविद्यालय संघाने सेंट जोसेफ पदवीपूर्व महगाविद्यालय धारवाड संघाचा 2-0 असा पराभव करून स्वातंत्र्य चषक पटकाविला. धारवाड येथील के.सी.डी. कॉलेज मैदानावर उपउपांत्य फेरीत लिंगराज पदवीपुर्व महगाविद्यालय संघाने पी.सी.जबीन पदवीपुर्व महाविद्यालय हुबळी संघावर 2-0 असा सफाईदार विजय संपादन केला. लिंगराज कॉलेजतर्फे अभिषेक चिन्ना बाबूने 2 गोल नोंदविले. उपांत्य फेरीच्या सामन्यात रेहान किल्लेदारच्या एकमेव गोलामुळे लिंगराज पदवीपुर्व महाविद्यालयने जेएसएसपी पदवीपुर्व महाविद्यालय धारवाड संघावर 1-0 असा निसटता विजय संपादन केला. अंतिम फेरीत लिंगराज पदवीपुर्व महाविद्यालय संघाने सेंट जोसेफ पदवीपुर्व महाविद्यालय धारवाड संघावर 2-0 असा एकतर्फी विजय संपादन केला. लिंगराज पदवीपुर्व महाविद्यालय संघातर्फे जयदेव सुळगेकर व आयान किल्लेदार यांनी प्रत्येकी एक गोल नोंदविला. सामन्यानंतर विजेत्या लिंगराज व उपविजेत्या सेंट जोसेफ धारवाड संघाना चषक देऊन गौरविले. या संघाला फुटबॉल प्रशिक्षक मानस नायक यांचे मार्गदर्शन लाभले.

Advertisement
Advertisement
Tags :

.