महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

बेंगळुरात अंगणवाडी कार्यकर्त्यांचे बेमुदत धरणे

11:54 AM Nov 21, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेंगळूर : राज्य सरकारकडून मागण्यांची दखल घेण्यात येत नसल्याने अंगणवाडी कार्यकर्त्यांनी सोमवारपासून बेंगळूरमध्ये बेमुदत धरणे आंदोलन छेडले आहे. एआयटीयुसीच्या नेतृत्त्वाखाली फ्रीडम पार्कवर अंगणवाडी कार्यकर्त्या आणि साहाय्यकांनी आंदोलन हाती घेतले आहे. अंगणवाडी कार्यकर्त्यांना शालेय कार्यक्रम, गृहलक्ष्मी योजना, आरोग्य सर्वेक्षण आदी कामे करावी लागतात. त्यामुळे कामाचा अधिक ताण पडत आहे. बेंगळूरमध्येच 2877 अंगणवाडी केंद्र आहेत. तेथे 430 कार्यकर्त्या आणि 1198 साहाय्यकांची पदे रिक्त आहेत. मागील तीन-चार वर्षांपासून तेथे भरती करण्यात आलेली नाहीत. 5 मार्च रोजी अधिसूचना जारी झाल्यानंतर अर्ज दाखल करण्यात आले आहेत. अर्ज दाखल करून 8 महिने होत आले तरी अद्याप नेमणुका करण्यात आलेल्या नाहीत, अशी नाराजी आंदोलकांनी व्यक्त केली आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article