महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

चंदगड तालुक्यात मानसिंग खोराटे यांना वाढता प्रतिसाद

04:05 PM Oct 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

चंदगड : आज दिंव्यांग,निराधार यांच्या जन आधार या संघटनेच्या झालेल्या कार्यक्रमात त्यांचे विविध प्रश्न आणि समस्यांसंदर्भात कार्यक्रम पार पाडला. यावेळी उपस्थित असलेल्या अनेक दिव्यांग बांधवांनी आपल्या विविध समस्या शासन दरबारी प्रलंबित असून त्यासाठि आपल्या हक्काचं नेतृत्व महाराष्ट्र विधानसभेत पाहीजे म्हणून मानसिंग खोराटे यांना पाठबळ देण्याचे सर्वानुमते ठरले. कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित दिव्यांग आणि निराधार नागरिकांनी आपापल्या समस्या मांडल्या. त्यात मुख्यत्वे दिव्यांग पेन्शनमध्ये वाढ, उपचार आणि पुनर्वसनासाठी आवश्यक त्या सोयी-सुविधांची उपलब्धता, शिक्षण आणि रोजगाराच्या संधींचा अभाव अशा अनेक प्रश्नांचा समावेश होता. तसेच, निराधार आणि असहाय व्यक्तींनी देखील त्यांच्या रोजच्या जीवनात येणाऱ्या अडचणी, आर्थिक मदतीची गरज आणि सामाजिक सुरक्षेच्या अभावाबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या.

Advertisement

कार्यक्रमाच्या प्रमुखांच्या मार्गदर्शनाखाली या सर्व प्रश्नांची नोंद घेण्यात आली आणि त्यांना सरकारच्या संबंधित विभागांपर्यंत पोहोचवण्याची ग्वाही देण्यात आली. प्रमुखांनी दिव्यांग बांधवांशी संवाद साधताना सांगितले मानसिंग खोराटे यांच्या शाश्वत विकासामुळे दिव्यांग व्यक्तींना वैद्यकीय मदत सहज उपलब्ध होईल. शिक्षण व रोजगाराच्या संधींना चालना देण्यासाठी विशेष लक्ष दिले जाईल. या कार्यक्रमात तालुक्यातील दिव्या निराधार व विधवा महिला सहभागी झालेल्या होत्या. दिव्यांग आणि निराधार लोकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेता येईल आणि आमच्या समस्या सोडवल्या जातील यासाठी मानसिंग खोराटे साहेबांची साथ गरजेची आहे" असे कार्यक्रमाचे अध्यक्ष व संस्थेचे संस्थापक जोतिबा गोरल यांनी व्यक्त केली.
Advertisement

या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून लाभलेल्या रोहिणी मेनसे यांनी तालुक्यातील दिव्यांग आणि निराधार नागरिकांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून दिली. आपल्या दिव्यांग आणि निराधार नागरिकांचा फक्त मतदान साठी उपयोग केला जातो. पण आपल्या हक्कासाठी लढणारी व्यक्ती म्हणजे मानसिंग खोराटे साहेब. दिव्यांग, निराधार आणि अन्य वंचित वर्गांना त्यांचा योग्य हक्क मिळेल, व तालुक्याचा शाश्वत विकास होईल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. यावेळी सोबत जनआधार , दिव्यांग ,निराधार व महिला कल्याणकारी संस्था चंदगड जोतिबा रामचंद्र गोरल - आंबेवाडी- संस्थापक अध्यक्ष .संदीप जोतिबा पाटील, सावर्डे- उपाध्यक्ष, सौ. संगीता आवडण ,मुरकुटेवाडी- सेक्रेटरी, . आण्णाप्पा रामचंद्र गोरल- खजिनदार, श्री. मारुती बाबू भाटे ,सुरते -सदस्य, . सतीश ओमाना कांबळे ,कडलगे -सदस्य सौ. कांचन चव्हाण ,मुरकुटेवाडी - विधवा महिला अध्यक्ष कोल्हापूर जिल्हा प्रमुख वक्ते रोहिणी मनसे सिताराम गावडे संजीवनी सुतार प्रतिभा देसाई मान्यवर व दिव्यांग व विधवा महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article