कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

पोक्सो प्रकरणांच्या वाढत्या नोंदी चिंताजनक

11:33 AM Jun 05, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

राज्यात दररोज दहा प्रकरणांची नोंद : खोट्या तक्रारींची संख्या अधिक : बेंगळूर पहिल्या स्थानावर

Advertisement

बेळगाव : राज्यासह बेळगाव जिल्ह्यात पोक्सो प्रकरणांची संख्या दिवसेंदिवस वाढतच  आहे. यंदा एप्रिलपर्यंत दररोज सरासरी दहा प्रकरणे दाखल झाली आहेत. पोक्सो प्रकरणांमध्ये बेंगळूर आघाडीवर असून बेळगाव जिल्हा राज्यात सहाव्या क्रमांकावर आहे. त्यामुळे पोक्सो प्रकरणांवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रशासनाकडून कडक कारवाई होणे गरजेचे आहे. अल्पवयीन मुलींवर अत्याचार होण्याचे प्रकार दरवर्षी वाढत चालले असल्याने ही चिंतेची बाब बनली आहे. चार वर्षे चार महिन्यात (जानेवारी 2021 ते 30 एप्रिल 2025) पर्यंत एकूण 15 हजार 904 प्रकरणांची नोंद झाली आहे. 2021 मध्ये 2 हजार 882 प्रकरणांची नोंद झाली आहे. चार वर्षात पोक्सो प्रकरणांच्या संख्येत  38.89 टक्क्यांनी वाढ झाली आहे. पोक्सो खटल्यांमध्ये आरोपींना शिक्षा होण्याचे प्रमाण कमी असल्यानेच दिवसेंदिवस पोक्सो प्रकरणात वाढ होत चालली असल्याचा आरोप केला जात आहे. त्याचबरोबर खोटी प्रकरणे दाखल करण्याचे प्रमाणही अधिक असल्याचे समोर येत आहे. बेंगळूरमध्ये राज्यात सर्वाधिक पोक्सो प्रकरणांची नोंद झाली आहे. 2024 ते 30 एप्रिल 2025 पर्यंत बेंगळुरात तब्बल 1 हजार 386 प्रकरणे दाखल झाली आहेत. दुसऱ्या क्रमांकावर म्हैसूर जिल्हा असून त्या ठिकाणी 442 प्रकरणे दाखल झाली आहेत.

Advertisement

चिक्कबळ्ळापूरमध्ये 410, तुमकूर 362, शिवमोगा 456, बेळगाव 335, मंड्या 311, हासन 322 प्रकरणांची नोंद झाली आहे. उत्तर कर्नाटकातील काही जिल्ह्यांमध्ये शंभर गुन्ह्यांची नोंद झाली असून दक्षिण कर्नाटकातील काही जिल्ह्यांमध्ये 150 हून अधिक प्रकरणांची नोंद असल्याची आकडेवारी पोलीस खात्याने उपलब्ध केली आहे. दरवर्षी पोक्सो प्रकरणांची संख्या वाढत असली तरी त्यामध्ये शिक्षा होणाऱ्यांची संख्या कमी आहे. गेल्या दोन वर्षात 2023 ते 2024 मध्ये दाखल एकूण 7 हजार 954 प्रकरणांमध्ये केवळ 130 प्रकरणात आरोपींना शिक्षा झाली आहे. खोटे गुन्हे आणि पोलिसांनी दाखल केलेल्या दोषारोपांमधील त्रुटींमुळे 1 हजार 682 प्रकरणांतून आरोपींची सुटका झाली आहे. उर्वरित प्रकरणे न्यायप्रविष्ट आहेत. काही प्रकरणे प्रेम प्रकरणातून घडल्याचेही समोर आले आहे. बहुतांश पालक बदनामीच्या भीतीने पोलिसात गुन्हा दाखल करण्यास पुढे येत नसल्याचेही दिसून आले आहे. एकंदरीत राज्यात दरवर्षी पोक्सो प्रकरणांची नोंद वाढत असल्याने त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी ठोस उपाययोजना हाती घेणे गरजेचे आहे.

...तर तातडीने कारवाई

अल्पवयीन मुलींवर होणारे लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी शाळा-महाविद्यालये आणि हॉस्टेलमध्ये जनजागृती केली जात आहे. अत्याचाराची घटना घडल्यानंतर पीडितेने किंवा पालकांनी साहाय्यवाणी क्रमांकावर संपर्क साधून तक्रार केल्यास तातडीने गुन्हा दाखल करून घेऊन कारवाई केली जाते.

- नीता वांडकर, जिल्हा बाल संरक्षण अधिकारीपोक्सो प्रकरणे

वर्ष       दाखल गुन्हे

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article