महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

वाढत्या वयातील कर्मचाऱ्यांची वाढती संख्या

06:30 AM Nov 24, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

यावर्षी स्वातंत्र्यदिनी, लाल किल्यावरून राष्ट्राला उद्देशून केलेल्या आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांनी भारतातील युवकांची संख्या लक्षणीय स्वरूपात असून त्यामुळे भारतीय युवकांना संशोधनासह नोकरी, रोजगाराच्या संदर्भात मोठ्या संधी उपलब्ध असल्याचे आवर्जून सांगितले. याच संदर्भात बोलताना पंतप्रधानांनी आज जागतिक स्तरावर कामकाजी-कर्मचाऱ्यांमध्ये वाढत्या वयोगटातील कर्मचारी मोठ्या व लक्षणीय संख्येत असतांनाच भारतात मात्र युवा वयोगटातील कर्मचाऱ्यांची संख्या वाढत असून सध्या आपल्या कामगार-कर्मचाऱ्यांमध्ये युवकांची संख्या ही सर्वाधिक म्हणजेच सुमारे 30 टक्के असल्याचे आवर्जून नमूद केले.

Advertisement

जागतिक संदर्भात कर्मचाऱ्यांच्या वयोमानाच्याबाबतीत पंतप्रधानांनी युवा कर्मचाऱ्यांची संख्या आणि तपशील भारत आणि भारतीय या उभयतांच्या संदर्भात उत्साहवर्धक ठरली असली तरी सद्यस्थितीत भारतात नोकरी-कामावर असणाऱ्यांमध्ये मात्र तरूण कर्मचाऱ्यांच्या तुलनेत वयाची साठी गाठणाऱ्या वा साठी ओलांडलेल्या कर्मचाऱ्यांचे प्रमाण वाढताना दिसते. केंद्रीय स्तरावरील सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी भारतातील आर्थिक सद्यस्थिती या विषयावर केलेल्या अभ्यासामध्ये हीच बाब प्रामुख्याने स्पष्ट झाली आहे.

Advertisement

अभ्यासाच्या सुरूवातीलाच स्पष्ट केल्यानुसार जागतिक स्तरावर कर्मचाऱ्यांच्या वयोगटाचा अभ्यास केला असता सध्या भारतातील कर्मचाऱ्यांचे युवा म्हणजेच 15 ते 25 वयोगटातील, अनुभवी म्हणजे 45 वर्षापर्यंतचे व वयस्कर म्हणजे 45 वर्षावरील अशा प्रकारे विभाजन करण्यात आले.

या संदर्भात वरील वयोगटानुसार खालीलप्रमाणे उपलब्ध असणारी संख्या व टक्केवारी महत्त्वपूर्ण ठरते.

लक्षणीय बाब म्हणजे अभ्यासात नमूद केल्यानुसार कुठल्याही देश आणि समाजाच्या संदर्भात तेथील नोकरी-रोजगाराचे प्र्रमाण अभ्यासतांना देशांतर्गत नोकरी-रोजगार करणाऱ्यांची संख्या आणि तपशील महत्त्वाचा ठरतो. या नेमक्या आकडेवारीची देशाच्या त्यावेळच्या एकूण लोकसंख्येशी तुलना करून नोकरदारांची संख्या व त्यातून त्यांची टक्केवारी कळू शकते.

याच टक्केवारीवरून देशात सध्या नोकरी-रोजगारांमध्ये नव्याने दाखल होणाऱ्या युवा उमेदवारांच्या तुलनेत प्रौढ वा वयस्कांचे प्रमाण तुलनेने वाढलेले दिसून येते. परिणामी देशांतर्गत नोकरी-रोजगाराचे प्रमाण आणि टक्केवारी वाढत्या स्वरूपात असली तरी त्याचे युवा लाभार्थी अपेक्षेपेक्षा कमी आढळून येतात. याउलट सेवानिवृत्ती वयोगटातील अथवा सेवानिवृत्त झालेल्या उमेदवारांना  त्यांचा अनुभव व कार्यक्षमता या आधारे संधी मिळण्याचे प्रमाण कायमस्वरूपी दिसून येतात. उद्योग व्यवसाय क्षेत्रांतर्गत विशेषत: प्रकल्प व्यवस्थापन, बांधकाम व मुलभूत सुविधा क्षेत्र, शिक्षण-संशोधन, व्यवस्थापन, प्रशिक्षण या कामी तर जेष्ठ-अनुभवी व प्रसंगी सेवानिवृत्तांना आवर्जून प्राधान्य दिले जाते व ही पध्दत कायम राहण्याची शक्यता आहे.

वरील आकडेवारीच्या संदर्भातील महत्वपूर्ण बाब म्हणजे कोरोना व त्यानंतरच्या कालावधीत म्हणजेच 2020-21 व नंतरच्या काळात नोकरी-रोजगारात नव्याने दाखल झालेल्यांची संख्या टक्केवारी ही सुमारे तीन वर्षे कायम स्वरूपी म्हणजेच 19 टक्के राहिली आहे तर तुलनात्मकदृष्ट्या याच कालावधीत तज्ञ व अनुभवी म्हणजेच 45 वर्षे व त्याहून अधिक वयोगटातील कर्मचाऱ्यांच्या संख्येत काहीशी वाढ होत आली आहे. यामध्ये अर्थातच निवृत्त कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. कोरोनाकाळ व त्यानंतरचे हे अतर्क्य परिणाम म्हणावे लागतील.

या आकडेवारीचा वयोगटानुसार विचार करून सांगायचे म्हणजे 15 ते 29 वर्षे या वयोगटातील उमेदवार-कर्मचाऱ्यांची संख्या 2016-17 या आर्थिक वर्षात  35.49 कोटीने वाढून ती 2022-23 या आर्थिक वर्षामध्ये 38.13 कोटी झाली. असे असतानापण या वयोगटातील नोकरी-रोजगारासाठी इच्छुक असणाऱ्या व प्रत्यक्षात नोकरी मिळू शकलेल्या युवा-उमेदवारांची टक्केवारी मात्र 31 टक्केने घटली. याचा थेट परिणाम अर्थातच तरूण उमेदवारांच्या वरील कालावधीत प्रत्यक्ष रोजगार संधी मिळण्यावर नकारात्मक स्वरूपात झाला.

याउलट 30 ते 45 वयोगटातील म्हणजेच अनुभवी कर्मचाऱ्यांच्या रोजगाराच्या संदर्भात सांगायचे झाल्यास त्यांच्या रोजगार संधींमध्ये वरील कालावधीत तुलनेने कमी प्रमाणावर परिणाम झाला. मात्र या वयोगटात 2016-17 ते 2022-23 या कालावधीत प्रत्यक्षात नोकरी-रोजगारामध्ये सक्रिय असणाऱ्यांची संख्या कायम स्वरूपी राहिल्याने त्यांना नोकरी-रोजगाराच्या संदर्भात नकारात्मक झळ फारशी बसली नाही ही वस्तुस्थिती आहे.

याच्याच पुढच्या टप्पाच्या म्हणजेच 55 ते 59 म्हणजेच सेवानिवृत्तीला पोहोचलेल्या कर्मचाऱ्यांच्या संदर्भात सांगायचे म्हणजे व्यक्तीगत व संसारिक स्तरावरील या निर्णायक टप्प्यातील कर्मचाऱ्यांचे रोजगार कायमच राहिले नसून त्यामध्ये वाढ होण्याचे प्रमाण राहिले आहे. यामध्ये अर्थातच निवृत्तीला पोहोचलेल्या अथवा निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे ही बाब उल्लेखनीय आहे. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीच्या वरील अभ्यासपूर्ण अहवालानुसार प्रामुख्याने दिसून आलेली बाब म्हणजे पंतप्रधानांनी नमूद केल्यानुसार आज जागतिक लोकसंख्येच्या तुलनेत भारतातील युवा उमेदवारांची संख्या तुलनेने सर्वाधिक असली तरी त्या तुलनेत त्यांना नोकरी-रोजगाराच्या संधी उपलब्ध होत नाहीत. तुलनेने वयस्कर व निवृत्ती वयोगटातील उमेदवारांना मात्र वाढत्या संधी उपलब्ध आहेत. नोकरी-रोजगारातील वयोगटाचे प्रमाण व परिणाम अनेकार्थांनी लक्षणीय ठरतात.

(आर्थिक वर्ष)  (55-59 वयोगटातील कर्मचारी) (25-29 वयोगटातील कर्मचारी)

खालील तपशील व आकेडवारीवरून ही बाब अधिक स्पष्ट होते.

(आर्थिक वर्ष)  (15 ते 29 वयोगटातील कर्मचाऱ्यांची टक्केवारी) (45 वर्षाहून अधिक वयोगटातील कर्मचाऱ्यांची टक्क्sवारी)

-दत्तात्रय आंबुलकर

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article