For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मादी जातीच्या वासरांची पैदास वाढली

12:12 PM Nov 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
मादी जातीच्या वासरांची पैदास वाढली
Advertisement

वासराची हमी योजना यशस्वी : दूध उत्पादनात होणार वाढ

Advertisement

बेळगाव : केंद्र सरकारने सुरू केलेल्या ‘मादी वासराची हमी’ या योजनेला उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात मादी वासरांच्या संख्येत समाधानकारक वाढ झाली आहे. त्यामुळे पशुपालकांच्या दुग्धोत्पादनात वाढ होणार आहे. ही योजना पशुपालकांना आर्थिकदृष्ट्या आधार ठरू लागली आहे. नर वासराच्या संगोपनाचा भार कमी करण्यासाठी ही योजना राबविण्यात आली आहे. अलीकडे नर जातीचे वासरू जन्माला येताच त्याची विक्री केली जाते. अशा परिस्थितीत गायींना मादी जातीचेच वासरू जन्माला यावे, यासाठी विशेष कृत्रिम रेतन उपलब्ध करण्यात आली आहे. ही कृत्रिम रेतन जिल्ह्यातील विविध गायींना भरविण्यात आली आहे. विशेषत: कृत्रिम रेतन भरविलेल्या सर्व गायींना मादी जातीचीच वासरे जन्माला आली आहेत. त्यामुळे पशुपालकांचाही या कृत्रिम रेतनाकडे कल वाढला आहे.

जातीवंत गायींच्या संख्येत भर पडणार

Advertisement

जिल्ह्यात 13 लाखांहून अधिक जनावरांची संख्या आहे. यामध्ये 85 हजारहून अधिक गो-वर्गीय जनावरांचा समावेश आहे. गायींना मादी जातीचे वासरू जन्माला येईल, याची खात्री नसते. मात्र, केंद्र सरकारच्या मादी हमी योजनेंतर्गत कृत्रिम रेतन भरविल्यानंतर मादी जातीचेच वासरू जन्माला येऊ लागले आहे. सर्व पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्येही मादी जातीचे कृत्रिम रेतन उपलब्ध करण्यात आले आहे. त्यामुळे येत्या काळात जातीवंत गायींच्या संख्येत भर पडणार आहे.

नर जातीचे वासरू पशुपालकांना ओझे 

शेतीत आधुनिक यांत्रिकीकरणाचा वापर वाढला आहे. त्यामुळे बैलांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे गायीने नर जातीच्या वासराला जन्म दिल्यास ते पशुपालकांसाठी आता ओझे वाटू लागले आहे. जन्मताच त्याची विक्री केली जात आहे. अशा परिस्थितीत गायींना मादी जातीचे वासरूच जन्माला यावे यासाठी ही योजना राबविली आहे. या योजनेमुळे अलीकडे मादी जातीच्या वासरांची पैदास वाढू लागली आहे. त्यामुळे या जातीवंत वासरांमुळे दूध उत्पादनातही वाढ होत आहे.

सर्व पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये कृत्रिम रेतन उपलब्ध 

गायींना मादी जातीचे वासरूच जन्माला यावे यासाठी विशेष कृत्रिम रेतन उपलब्ध करण्यात आली आहे. सर्व पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये ही कृत्रिम गर्भधारणा रेतन ठेवण्यात आली आहे. पशुपालकांनी याचा लाभ घ्यावा.

-डॉ. आनंद पाटील, तालुका पशुवैद्यकीय अधिकारी

Advertisement
Tags :

.