डोंगरगाव शाळा विकासासाठी निधी मंजूर करण्याची मागणी
डोंगरगाव ग्रामस्थांचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांना निवेदन
खानापूर : तालुक्यातील डेंगरगाव येथील शाळेच्या इमारतीच्या दुरुस्तीसाठी तसेच शाळेच्या इतर विकासासाठी निधी मंजूर करण्यात यावा, यासाठी ग्रामस्थांनी पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांची भेट घेऊन शाळेच्या विकासासाठी निधी मंजूर करण्यात यावा, अशा आशयाचे निवेदन नुकतेच देण्यात आले. याबाबत पालकमंत्र्यांनी आपण शाळेच्या विकासासाठी निश्चित प्रयत्न करू, असे आश्वासन दिले आहे. डोंगरगाव येथील मराठी शाळेची स्थापना 1957 साली झाली आहे. अतिशय दुर्गंम भागात असल्याने या शाळेचा म्हणावा तसा विकास झालेला नाही. डोंगरगाव हे शिरोली ग्राम पंचायतीतील भीमगड अभयारण्याच्या क्षेत्रात येते. या शाळेत अनेक विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतलेले आहे. या शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी शाळेच्या विकासासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र शाळेच्या विकासासाचा खर्च मोठा असल्याने शासनाकडून विकासासाठी निधी मंजूर करण्यात यावा, म्हणून डोंगरगाव ग्रामस्थांनी बेळगाव येथे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांची भेट घेऊन शाळेच्या विकासासाठी निधी मंजूर करण्यात यावा, अशा आशयाचे निवेदन दिले आहे.
विकासाबाबत आराखडा तयार करण्याच्या सूचना
शाळेच्या स्थापनेपासून ते आतापर्यंतची सर्व माहिती पालकमंत्र्यांना दिली आहे. तसेच डोंगरगाव शाळेची पाहणी करून विकासाबाबत आराखडा तयार करण्यासाठी आपल्या सचिवाना सूचना केल्या आहेत. पालकमंत्र्यांना निवेदन देताना डोंगरगाव ग्रामस्थांसह, माजी विद्यार्थी संघटनेचे सदस्य उपस्थित होते.