For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

साखरेची किमान आधारभूत किंमत, इथेनॉलचा दर वाढवा

02:20 PM Dec 01, 2024 IST | Radhika Patil
साखरेची किमान आधारभूत किंमत  इथेनॉलचा दर वाढवा
Increase the minimum support price of sugar, ethanol rate
Advertisement

कोल्हापूर : 

Advertisement

राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी नवी दिल्ली येथे केंद्रीय अन्न वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांची भेट घेतली. 2019 पासून साखरेची किमान आधारभूत किंमत 3100 रूपये प्रतिक्विंटल आहे. दुसरीकडे शासनाकडून दरवर्षी उसाच्या एफआरपीमध्ये वाढ केली जात आहे. त्यामुळे साखर कारखान्यांचा आर्थिक बोजा वाढत आहे. परिणामी उसाच्या किमान हमीभावानुसार, साखरेच्या किमान आधारभूत किंमतीमध्ये वाढ करावी, अशी मागणी खासदार महाडिक यांनी केली आहे. त्यासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना फेडरेशन, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघ आणि इस्माच्यावतीने, केंद्रीय मंत्र्यांना मागणीचे पत्र देण्यात आले

सन 2018-19 पासून आतापर्यंत साखरेच्या किमान आधारभूत किंमतीमध्ये वाढ झालेली नाही. केंद्र सरकारच्या निर्देशानुसार, अजुनही साखरेला प्रतिक्विंटल 3100 रूपये इतकाच किमान आधारभूत दर आहे. एकिकडे साखरेचा उत्पादन खर्च वाढत आहे. तर त्याचवेळी शासनाकडून शेतकऱ्यांना दरवर्षी किमान ऊस दरामध्ये वाढ दिली जाते. पण त्याप्रमाणात साखर कारखान्यांची एमएसपी वाढवली जात नाही. गेल्यावर्षी उसाची किमान एफआरपी 3150 रूपये होती. यंदा ही एफआरपी वाढली जाईलच. पण त्याचवेळी साखरेचा उत्पादन खर्च क्विंटलमागे 4166 रूपये इतका झालाय. त्यामुळे साखरेचा उत्पादन खर्च आणि शेतकर्यांना द्यावयाची किमान आधारभूत किंमत, यांचा विचार केला, तर साखर कारखान्यांचे आर्थिक गणित बिघडलेले आहे. अनेक कारखान्यांना कर्ज काढून, शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम द्यावी लागते. त्यामुळे साखरेच्या किमान आधारभूत वाढ किंमतीमध्ये 3100 रूपयांपासून 4200 रूपये प्रतिक्विंटल इतकी वाढ करावी, अशी मागणी जोशी यांच्याकडे केली आहे.

Advertisement

                                  इथेनॉलच्या दरातही वाढ करण्याची मागणी

साखरेची किमान आधारभूत किंमत वाढवल्यानंतर, त्याचप्रमाणात इथेनॉलच्या दरात प्रतिलिटर पाच रूपये वाढ करणे गरजेचे आहे, या मुद्दयाकडेही महाडिक यांनी लक्ष वेधले.ान 2023-24 या वर्षात देशात साखरेचा तुटवडा निर्माण होईल, या शक्यतेने केंद्र सरकारने साखर कारखान्यांना इथेनॉल निर्मितीला बंदी घातली. आता ही बंदी उठवली असली, तरी इथेनॉलच्या दरातही वाढ करणे गरजेचे आहे, अशी मागणी महाडिक यांनी केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे करण्यात आली आहे.

Advertisement
Tags :

.