For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

डेंग्यू निदानासाठी चाचणीचे प्रमाण वाढवा

12:59 PM Jul 11, 2024 IST | Tarun Bharat Portal
डेंग्यू निदानासाठी चाचणीचे प्रमाण वाढवा
Advertisement

जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांची पूर निवारण-डेंग्यू नियंत्रण बैठकीत अधिकाऱ्यांना सूचना

Advertisement

बेळगाव : राज्यभरात डेंग्यू रुग्णांची संख्या वाढत असून जिल्ह्यामध्ये डेंग्यू नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. डेंग्यू निदानासाठी चाचणीचे प्रमाण वाढविण्यात यावे, डेंग्यू ऊग्णांना योग्य उपचार देण्यात यावेत, असे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बुधवारी पूर निवारण आणि डेंग्यूसंदर्भात विविध खात्यांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन ते बोलत होते. जिल्ह्यामध्ये डेंग्यू रुग्णांची संख्या वाढत आहे. यासाठी डेंग्यू निदान करण्याकरिता तपासणी वाढवा, शहरासह ग्रामीण भागातील गटारींची स्वच्छता करून डास निर्मूलनासाठी उपाययोजना करण्यात याव्यात. आरोग्य खाते, महानगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्था, तालुका पंचायत यांच्या समन्वयाने डेंग्यू नियंत्रणात आणावा, अशी सूचनाही त्यांनी केली. सध्या उत्तम प्रकारे पाऊस होत असून जिल्ह्यातील नद्यांच्या पाणीपातळीमध्ये वाढ झाली आहे. पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता असून आवश्यक असणाऱ्या उपाययोजना राबविण्याची सूचना अधिकाऱ्यांना केली. याबाबतचा अहवाल सादर करण्यासाठीही त्यांनी सांगितले.

जिल्ह्यामध्ये शहर आणि स्थानिक स्वराज्य संस्था व ग्रा. पं. च्या व्याप्तीमध्ये निश्चित करण्यात आलेल्या परिहार केंद्रांना भेट देऊन तेथील सुविधांची पाहणी करून अहवाल द्यावा. याबरोबरच गोशाळा संदर्भातील माहिती देण्याचे त्यांनी सांगितले. अतिवृष्टीमुळे प्राणहानी होण्याची शक्यता आहे. यासाठी त्याठिकाणी त्वरित उपाययोजना राबविण्यात याव्यात. कोणत्याही परिस्थितीत भरपाई देण्यास दिरंगाई करण्यात येऊ नये. जीवितहानी टाळण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. प्रांताधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे. आरोग्य खात्याने पूरपरिस्थिती उद्भवलेल्या भागामध्ये रोगराई वाढू नये, यासाठी औषधे व आवश्यक साधनसामग्री सज्ज ठेवावी, अशी सूचना त्यांनी केली. शहर आणि ग्रामीण भागामध्ये शुद्ध पिण्याचे पाणीपुरवठा करण्यावर लक्ष केंद्रित करण्यात यावे. वारंवार पाण्याची चाचणी करण्यात यावी, अशी सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी केली.

Advertisement

यावेळी जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस होत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील नदीपात्रांमध्ये पाणीपातळी वाढून पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. पूर नियंत्रणासाठी आवश्यक त्या उपाययोजना हाती घेण्यात याव्यात, असे त्यांनी सांगितले. पूरस्थितीदरम्यान सुरक्षा व्यवस्था पुरविण्यासाठी कार्यवाही करण्यात येईल. ग्रा. पं. मध्ये पूर निवारण बैठक घेऊन अहवाल देण्यासाठी अधिकाऱ्यांना सूचना करण्यात आल्याचे गुळेद यांनी सांगितले. यावेळी निवासी जिल्हाधिकारी विजयकुमार होनकेरी, मनपा आयुक्त अशोक दुडगुंटी, प्रांताधिकारी श्रवण नायक, बैलहोंगलचे प्रांताधिकारी प्रभावती फकीरपूर, कृषी खात्याचे संचालक शिवनगौडा पाटील, जि. पं. संचालक रवि बंगारप्पा, गंगाधर दिवटर यांच्यासह विविध खात्यांचे अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकाऱ्यांची जिल्हा रुग्णालयाला भेट

जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी जिल्हा रुग्णालयाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. रुग्णांशी व आरोग्य अधिकाऱ्यांशी चर्चा केली.

 

Advertisement
Tags :

.