कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

हलगाजवळील संपर्क रस्त्यावर चिखलामुळे वाहने घसरून पडण्याच्या प्रमाणात वाढ

10:32 AM May 27, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सांबरा : हलगा गावाजवळील संपर्क रस्त्यावर चिखलामुळे निसरड निर्माण झाली असून वाहने घसरून पडण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. तरी रस्त्यावर चिखल पसरविण्यास कारणीभूत ठरणाऱ्या वाहनांवर कारवाई करावी, अशी मागणी वाहनचालकांतून होत आहे. या रस्त्यावर झालेल्या निसरडीमुळे सायकलस्वार तसेच दुचाकीस्वारांना आपला जीव मुठीत घेऊन जावे लागत आहे. हलगा गावाजवळ राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूला असलेल्या संपर्क रस्त्याच्या बाजूला दोन ठिकाणी खासगी उद्योग आहेत. तेथून येणाऱ्या चारचाकी वाहनाच्या टायरमधून मोठ्या प्रमाणावर माती अडकून येत असून तीच माती सर्व्हिस रस्त्यावर पसरत आहे.

Advertisement

त्यामुळे रस्त्यावर निसरड निर्माण होत आहे. निसरडीमुळे दररोज दुचाकीस्वार पडण्याच्या प्रमाणात वाढ झाली असून मोठे अपघातही नाकारता येत नाहीत. यासाठी रस्त्यावर माती पसरण्यास कारणीभूत ठरणाऱ्या वाहनचालकांना समज द्यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. काही नागरिकांनी याकडे ग्रामपंचायतीचे लक्ष वेधले आहे. तरी ग्रामपंचायतीने याची दखल घेऊन संबंधितांना सक्त सूचना करावी, अशी मागणी नागरिकांतून करण्यात येत आहे. मागील वर्षीही याच ठिकाणी वाहनातून पडलेल्या मातीमुळे निसरड निर्माण झाली होती. नागरिकांनी केलेल्या तक्रारी लक्षात घेऊन ग्रामपंचायतीने संबंधित उद्योग चालविणाऱ्यांना ग्रामपंचायतीमध्ये बोलावून यासंबंधी कडक सूचना केल्या होत्या. तसेच यावर्षीही ग्रामपंचायतीने यावर उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article