For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

तिरुमला तिरुपती देवस्थानच्या ठेवींमध्ये वाढ

06:10 AM Apr 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
तिरुमला तिरुपती देवस्थानच्या ठेवींमध्ये वाढ
Advertisement

चालू वर्षात 1161 कोटी रुपयांच्या मुदतठेवी : बँकेतील जमा रक्कम 18,817 कोटी रुपये : 11 टन सोने

Advertisement

वृत्तसंस्था/ तिरुपति

जगातील सर्वात श्रीमंत मंदिर ट्रस्ट तिरुमला तिरुपती देवस्थानने यंदा 1161 कोटी रुपयांच्या मुदतठेवी ठेवल्या आहेत. मागील 12 वर्षांमध्ये हे प्रमाण सर्वाधिक राहिले आहे. हा ट्रस्ट जगातील सर्वात श्रीमंत मंदिर ट्रस्ट आहे. मागील 12 वर्षांमध्ये वार्षिक आधारावर 500 कोटी रुपये किंवा त्याहून अधिक रक्कम जमा करणारे हे देशातील एकमात्र हिंदू धार्मिक ट्रस्ट आहे.

Advertisement

2012 पर्यंत ट्रस्टची मुदतठेव 4820 कोटी रुपयांची होती. यानंतर तिरुपती ट्रस्टने 2013-14 दरम्यान 8467 कोटी रुपयांची रक्कम जमा केली. हे देशातील कुठल्याही मंदिर ट्रस्टसाठी सर्वाधिक प्रमाण आहे. ट्रस्टच्या बँकांमधील एकूण मुदतठेवी 13,287 कोटी रुपयांच्या झाल्या आहेत.

याचबरोबर मंदिर ट्रस्टकडून संचालित अनेक ट्रस्ट असून यात श्री वेंकटेश्वर नित्य अन्नप्रसादम ट्रस्ट, श्री वेंकटेश्वर प्राणदानम ट्रस्ट इत्यादींचा समावेश असून त्यांनाही भाविकांकडून मोठ्या प्रमाणात देणगी प्राप्त होते. या अन्य ट्रस्टच्या सुमारे 5529 कोटी रुपयांच्या मुदतठेवी आहेत.

बँक बॅलन्समध्ये मोठी वाढ

सर्व बँका आणि ट्रस्टमध्ये तिरुमला तिरुपती ट्रस्टची जमा रक्कम 18,817 कोटी रुपयांवर पोहोचली आहे. ट्रस्ट स्वत:च्या मुदतठेवींवर व्याजाच्या स्वरुपात वर्षाकाठी 1600 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवित आहे. याचबरोबर अलिकडेच 1,031 किलोग्रॅम सोने जमा झाल्यावर बँकांमध्ये मंदिराचे सोने भांडार देखील वाढून 11,329 किलोग्रॅमवर पोहोचले आहे.

वार्षिक आधारावर होतेय वाढ

तिरुमला तिरुपती देवस्थान ट्रस्टच्या मुदतठेवींमध्ये वार्षिक आधारावर वाढ होत आहे. 2013 मध्ये 608 कोटी, 2014 मध्ये 970 कोटी, 2015 मध्ये 961 कोटी, 2016 मध्ये 1153 कोटी, 2017 मध्ये 774 कोटी, 2018 मध्ये 501 कोटी रुपयांच्या मुदतठेवी जमा करण्यात आल्या होत्या. मागील 12 वर्षांमध्ये कोरोना संकटकाळात मुदतठेवींचा आकडा घटला होता. 2019 मध्ये 285 कोटी, 2020 मध्ये 753 कोटी, 2021 मध्ये 270 कोटी, 2022 मध्ये 274 कोटी रुपयांच्या मुदतठेवी ठेवण्यात आल्या होत्या.

Advertisement
Tags :

.