परतीच्या जोरदार पावसामुळे नदी-नाल्यांच्या पाणीपातळीत वाढ
भातपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पावसाळ्याचे दिवस असल्याचे चित्र
वार्ताहर/किणये
तालुक्यात परतीच्या पावसाचा जोर सुरुच आहे. गुऊवारी सकाळीही जोरदार पाऊस झाला. बुधवारी सायंकाळी मात्र या परतीच्या पावसाने तालुक्मयाला अक्षरश: झोडपून काढले. यामुळे नदी-नाल्यांच्या पाणीपातळीत कमालीची वाढ झाली आहे. तसेच ठिकठिकाणी पाणी साचल्यामुळे दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर पावसाळ्याचे दिवस सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे. गेल्या आठ दिवसांपासून परतीचा पाऊस सुरू आहे. यामुळे शेत शिवारातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामळे सध्या शेतकरी हवालदिल झाला आहे. पोसवून आलेली भातपिके आडवी झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे यंदा भात पिकाच्या उताऱ्यात घट होणार असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे. बुधवारी सायंकाळी तालुक्मयात मुसळधार पाऊस झाला. गुऊवारी सकाळीही तालुक्मयात जोरदार परतीचा पाऊस झाला. दुपारच्या सत्रात पावसाने थोड्या प्रमाणात विश्र्रांती घेतली होती. मात्र दुपारी उष्णतेमध्ये वाढ होऊन पुन्हा सायंकाळी तालुक्मयाच्या काही भागात पाऊस झाला.
या मुसळधार पावसामुळे नदी-नाल्यांच्या पाणीपातळीत पुन्हा वाढ झाली. मान्सून कालावधीमध्ये पश्चिम भागातील मार्कंडेय नदी व किणये- संतिबस्तवाड भागातील मुंगेत्री नदीला पूर आला होता. नदीकाठच्या आजूबाजूला असलेल्या शिवारात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. यामुळे भात व अन्य पिकांचे नुकसान होऊन भातरोप लागवडीला विलंब झाला.
सर्वाधिक फटका बळीराजाला
मध्यंतरीच्या कालावधीत पावसाचे प्रमाण कमी झाल्यामुळे नदी-नाल्यांच्या पाणी पातळीत घट झाली होती. मात्र पुन्हा गेल्या आठ दिवसांपासून सतत सुरू असलेल्या परतीच्या पावसामुळे नदी नाल्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. परतीचा पाऊस उन्हाळ्यात जाणवणाऱ्या पाणी समस्येवर काही प्रमाणात मात करण्यासाठी उपयोगी ठरणार आहे. मात्र खरीप हंगामातील सुगीच्या कालावधीत व पीक बहरून येण्याच्या काळातच हा पाऊस होत असल्यामुळे पिकांचे अधिक प्रमाणात नुकसान झाले आहे. याचा सर्वाधिक फटका बळीराजाला बसला आहे. सध्याच्या पाण्याचा उपयोग उन्हाळ्यातील भाजीपाला पिकासाठी होणार आहे. पण या परतीच्या पावसामुळे भात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तसेच सोयाबीन पिकेही जमीनदोस्त झाली आहेत.
भुईमूग काढणी खोळंबली
तालुक्मयाच्या विविध ठिकाणी भुईमूग काढणी सुरू करण्यात आली होती, मात्र पाऊस सुरू असल्यामुळे ही काढणी खोळंबली आहे. अति पावसामुळे भुईमूग शेंगा पुन्हा जमिनीतच उगवून येत आहेत. असाच पाऊस सुरू राहिल्यास यंदाच्या खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार असल्याची चिंता शेतकऱ्यांना लागून राहिली आहे.
पीक नुकसानभरपाई देण्याची मागणी
परतीच्या पावसामुळे भाजीपाला पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यंदा तालुक्मयाला ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा व सर्व शेतकऱ्यांना पीक नुकसानभरपाई प्रशासनाने द्यावी, अशी मागणी शेतकरीवर्ग करू लागले आहेत.