महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

दारूच्या अतिसेवनाने होणाऱ्या मृत्यूसंख्येत वाढ

10:28 AM Nov 28, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

तऊण पिढी दारूच्या विळख्यात : महिलांमध्येही दारू सेवनाचे व्यसन,सहा वर्षांत गोव्यात 4, 939 मृत्यू

Advertisement

पणजी : राज्यात दारूच्या अतिसेवनामुळे यकृत आजारांचा धोका वाढत असून, गेल्या सहा वर्षांत एकूण 4,939 मृत्यूंची नोंद राज्यात झाली आहे. राज्यातील वाढत्या मद्यपानाचा प्रश्न गंभीर होत असल्याचेही आकडेवारीतून स्पष्ट झाले असून, दर दिवशी सरासरी 3 मृत्यूंची नोंद राज्यात होताना दिसते, अशी माहिती सरकारने जारी केलेल्या  अहवालातून समोर आली आहे. हल्लीच्या तऊणांमध्ये दारू पिण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. दारूच्या अतिसेवनामुळे यकृतासंदर्भातील विविध आजार होऊन त्यात अनेकांचा मृत्यू होत आहे. त्यात अल्कोहोलिक यकृत सिरोसिस, यकृत सिरोसिस, जुना यकृत रोग, आणि यकृत खराब होणे अशा आजारांचा समावेश आहे. गेल्या सहा वर्षांत झालेल्या एकूण 4,939 मृतांमध्ये 4 हजार 528 पुऊष तर फक्त 411 महिलांचा समावेश आहे.

Advertisement

ग्रामीण भागांत अधिक प्रमाण

अति दारुसेवनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण शहरी भागांपेक्षा ग्रामीण भागात जास्त असून मृत्यू होणाऱ्यांमध्ये पुऊषांचा आकडा सर्वाधिक असल्याचे अहवालातून दिसून आले आहे. तसेच महिलांचा आकडा कमी असला तरी महिलावर्गामध्ये देखील दारू पिण्याची संस्कृती आज ऊजताना दिसत आहे. याचा विचार करता भविष्यासाठी ही धोक्याची घंटा आहे. तसेच 2015 ते 2022 या आठ वर्षांच्या कालावधीत यकृत आजांरामुळे गोवा वैद्यकीय महाविद्यालयात (गोमेकॉ) एकूण 3 हजार 196 जणांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. त्यात अल्कोहोलिक यकृत ]िसरोसिस व यकृत रोगामुळे गोमेकॉत 2 हजार 500 मृत्यू, यकृत सिरोसिस 605, जुन्या यकृत रोगामुळे 80 तर यकृत खराब झाल्यामुळे 11 जणांचा मृत्यू झालेला आहे. म्हणजेच दारूच्या अतिसेवनामुळे गोमेकॉत वर्षांला सरासरी 400 मृत्यूंची नोंद आज होताना दिसत आहे.

अति दारुसेवनाचे प्रमाण तरुणांत अधिक

गेल्या काही वर्षांत तऊणाई दाऊच्या विळख्यात अडकत चालली आहे. दारूवर आतापासूनच नियंत्रण न ठेवल्यास राज्याला भविष्यात बिकट संकटांचा सामना करावा लागू शकतो. कारण दारूच्या अधिक आहारी जात असलेल्यांमध्ये 15 ते 30 या वयोगटातील तऊणांचा समावेश अधिक प्रमाणात वाढत चालला आहे. तसेच दारूच्या अतिसेवानामुळे अनेक संसार देखील आज उद्ध्वस्त होताना दिसत आहे. दारू पिऊन महिला हिंसाचाराच्या घटना देखील राज्यात वाढताना दिसत आहे.

केंद्र सरकारच्या योजनेस प्रतिसाद नाही

दारूच्या अतिसेवनाला बळी पडलेल्या लोकांना केंद्र सरकारतर्फे मदत करण्यासाठी प्रत्येक राज्यात समाज कल्याण खात्यामार्फत प्रिव्हेन्शन ऑफ अल्कोहोलिसम योजना आखण्यात आली आहे. परंतु गोव्यात गेल्या दोन वर्षांत या योजनेचा लाभ कुणीही घेतलेला नाही, अशी माहिती समाज कल्याण खात्यातर्फे देण्यात आली आहे.

मद्यपींचे वेळोवेळी समुपदेशन आवश्यक

पुऊष अधिक दारूचे सेवन करताना आज दिसतात. म्हणून पुऊषांचा आकडा यकृत आजारांमध्ये जास्त दिसून येतो. त्यांना यकृताचा आजार होण्याची शक्यता देखील 90 टक्क्यांपर्यंत असते. आज अनेक यकृत आजार असलेले ऊग्ण उपचार घेतात. उपचार घेऊन बरेही होतात. परंतु परत दारू पिण्यास सुऊवात करतात. ज्यामुळे पुढे अनेक गंभीर समस्या उद्भवतात. दारूच्या अतिसेवनामुळे झालेले आजार पुढे दुसऱ्या समस्या निर्माण करीत राहतात. दारू शरीराला नेहमी घातकच असते. त्यामुळे पौष्टिक आहार, वेळेवर उपचार, भरपूर पाणी पिणे अशा ऊग्णांना आवश्यक आहे. मद्यपींचे वेळोवेळी समुपदेशन करणे काळाची गरज आहे. कारण समुपदेशनामुळे थोड्या प्रमाणात का होईना परंतु फरक जाणवेल, असे मत राज्यांतील काही डॉक्टरांनी व्यक्त केले आहे.

सहा वर्षांतील राज्यातील स्थिती

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article