महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

मडगावात भिकाऱ्यांच्या सुळसुळाटात वाढ

12:14 PM Dec 25, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

नाताळाच्या खरेदीसाठी जाणाऱ्यांची सतावणूक, पोलीस व अन्य यंत्रणांचे कारवाईकडे दुर्लक्ष

Advertisement

मडगाव : मडगावात नाताळासारख्या सणासुदीच्या काळात भिकाऱ्यांचा सुळसुळाट वाढल्याचे आणि लोकांची पाठ धरून भीक मागणाऱ्यांकडे पोलीस तसेच संबंधित अन्य कारवाई यंत्रणांकडून दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. लहान एक-दोन वर्षाच्या मुलांना कंबरेवर घेऊन शहरी भागात डझनभर महिला भीक मागताना दिसत आहेत. त्यांची भीक मागण्याची पद्धत भन्नाट असते. 10 ते 20 ऊपये हातावर ठेवले, तरी त्यांचे समाधान होत नसते. एखाद्या भुसारी दुकानाच्या बाहेर राहून सणानिमित्त बाजारहाट करण्यासाठी आलेल्यांची पाठ या भिकारी महिला सोडत नसतात. काही दिवस जेवण केलेले नसल्याचे सांगून त्या पाठीमागे लागून तांदूळ, आटा, तेल असे साहित्य मागून घेतात. कंबरेवर लहान मूल असल्याने काही जण त्यांना सहानुभूती दाखवून एक-दोन किलो धान्य देत असतात. पण या महिला मिळालेले साहित्य बाजूला ठेवून पुन्हा भीक मागण्यासाठी अन्य लोकांच्या मागे लागत असतात. मडगावात वाहतूक सिग्नल असलेले कोलवा सर्कल, बोल्शे सर्कल परिसरांतही वरील प्रकारचे भिकारी वाहने सिग्नलमुळे थांबली असता वाहनातील लोकांकडे जाऊन पैशांची मागणी करतात. भीक मागणे हा कायद्याने गुन्हा असला,. तरी पोलिसांकडून या भिकाऱ्यांवर कारवाई होत असल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे त्यांचे चांगलेच फावत आहे.

Advertisement

महिला पोलिसांचे पथक तयार करून अशा भिकारी महिलांवर कारवाई करण्याची गरज समाजसेवक व माजी नगरसेवक रामदास हजारे यांनी व्यक्त केली. कोणत्याही प्रकारचे अपंगत्व नसताना वरील प्रकारे लहान मुलांना घेऊन या महिला भीक मागत असल्याबद्दल त्यांनी संताप व्यक्त केला. विशीतील वा तिशीतील या महिला तसेच अन्य लहान मुले ही सर्व परप्रांतीय असून नाताळ व नववर्षाच्या वेळी खास गोव्यात येऊन भीक मागणे हा त्यांचा धंदाच बनला असल्याचे हजारे म्हणाले. ब्रिटन तसेच आखाती देशांत असलेले बहुतेक ख्रिस्तीबांधव गोव्यात नाताळ सण साजरा करण्यासाठी येत असतात. त्यांना खरेदीसाठी जाताना हे भिकारी सतावतात. त्यातील काही सधन व्यक्ती या भिकाऱ्यांना भीक घालत असल्याने त्यांचे फावत आहे. त्यातच पोलिसांचा बडगा नसल्याने मडगाव ही व्यवसायिक राजधानी भिकाऱ्यांच्या वावराच्या बाबतीतही ‘नंबर वन’ बनत चालली असल्याचे दिसून येत आहे. स्थानिक आमदार दिगंबर कामत यांनी पोलीस अधीक्षक तसेच जिल्हाधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन या भिकाऱ्यांवर कारवाईसाठी निर्देश द्यावेत, अशी मागणी मडगाववासियांकडून होत आहे. फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांनी वाहतूक सिग्नलवर भीक मागणाऱ्यांचा प्रश्न विधानसभेत उपस्थित केला होता. त्यावेळी एक-दोन दिवस कारवाई झाली होती. त्यानंतर हे प्रकार नित्याचेच बनून राहिले आहेत.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article