6 महिन्यात स्मार्टफोनच्या मागणीत वाढ
अॅपल आणि सॅमसंग यांची दमदार कामगिरी : आयडीसीच्या अहवालात माहिती
वृत्तसंस्था/ कोलकाता
इंटरनॅशनल डेटा कॉर्पोरेशन (आयडीसी)यांनी दिलेल्या माहितीनुसार भारतीय स्मार्टफोन बाजारामध्ये नव्या वर्षातील पहिल्या सहा महिन्यांमध्ये 7.2 टक्के इतकी वाढीव वृद्धी दिसून आली आहे. या दरम्यान जवळपास 6.9 कोटी स्मार्टफोन पाठवण्यात आले आहेत.
कॅलेंडर वर्ष 2024 च्या दुसऱ्या तिमाहीमध्ये बाजारात मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये 3.2 टक्के स्मार्टफोन विक्रीत वृद्धी नोंदवली गेली आहे. जवळपास 3.5 कोटी इतके स्मार्टफोन विक्रेत्यांकडे पाठवण्यात आले होते. दुसऱ्या तिमाहीचा उत्तरार्ध वर्षाच्या दुसऱ्या सहा महिन्याची सुरुवात असून यामध्ये नोव्हेंबरपर्यंत स्मार्टफोनची विक्री होत राहणार आहे. तिमाहीच्या आधी सुरुवातीचा राहिलेला स्टॉक कमी करण्यासाठी विक्रेत्यांनी प्रयत्न केला आहे.
अॅपल, सॅमसंगचा दबदबा
जुलै आणि ऑगस्ट या दरम्यान कंपनीने मध्यम प्रीमियम आणि प्रीमियम श्रेणीतले नवे फोन सादर केले आहेत. प्रीमियम श्रेणीमध्ये पाहता अॅपल आणि सॅमसंग या दोन कंपन्यांनी स्मार्टफोन विक्रीमध्ये दमदार कामगिरी नोंदवली आहे. या कंपन्यांचा अनुक्रमे बाजारातील वाटा 22 टक्के वाढून 30 टक्केपर्यंत पोहोचला आहे.
महत्त्वाची आकडेवारी..
? 2024 च्या 6 महिन्यात 7.2 टक्के शिपमेंटमध्ये वाढ
? दुसऱ्या तिमाहीत 27 दशलक्ष 5जी स्मार्टफोन्सची शिपमेंट
? तिमाहीत 5 जी स्मार्टफोन्सचा वाटा 77 टक्के अधिक